शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 16:45 IST

राजधानी दिल्लीत 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.

Delhi Flood: राजधानी दिल्लीत गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदीने विक्रमी जलपातळी गाठली आहे. यामुळे दिल्लीतील सखल भाग पुराच्या पाण्यात बुडाला आहे. रहिवासी भागातही पाणी तुंबल्यामुळे अनेक ठिकाणी घरे-दुकाने पाण्याखाली गेली आहेत. नदीची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी G-20 परिषदेचाही हवाला दिला आहे.

सीएम केजरीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले की, आज (बुधवार) दुपारी 1 वाजता दिल्लीतील यमुनेची पातळी 207.55 मीटरवर पोहोचली आहे. ही धोक्याच्या चिन्हाच्या (205.33 मीटर) वर आहे. याआधी 1978 मध्ये यमुनेची कमाल पातळी 207.49 मीटर पोहोचली होती. त्यावेळी दिल्लीत पूर आला होता आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. आता पाण्याची पातळी 207.55 मीटरवर पोहचल्यामुळे दिल्लीत पूराचा धोका वाढला आहे. 

जलपातळी 207.72 मीटरपर्यंत पोहोचेलते पुढे म्हणाले की, केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अंदाजानुसार यमुनेची पातळी आज रात्री 207.72 मीटरपर्यंत पोहोचेल, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. दिल्लीतील पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत नसून, हरियाणातील हथिनीकुंडमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पाणीपातळी वाढत आहे. तुम्हाला विनंती करतो की, शक्य असल्यास हथिनीकुंडचे पाणी मर्यादित वेगाने सोडावे, जेणेकरून दिल्लीतील यमुनेची पातळी आणखी वाढू नये.

'जगाला चांगला संदेश जाणार नाही'जी-20 शिखर परिषदेचा दाखला देत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि काही आठवड्यात येथे G20 शिखर परिषद होणार आहे. देशाच्या राजधानीत आलेल्या पुराच्या बातम्यांनी जगाला चांगला संदेश जाणार नाही. आपण सर्वांनी मिळून दिल्लीच्या जनतेला या परिस्थितीतून वाचवायचे आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले.

दिल्लीतील या भागात पाणी तुंबलेकाश्मीर गेटच्या मोनस्ती मार्केट, रिंगरोड, यमुना घाट, यमुना बाजार परिसरात पुराचे पाणी पोहोचले आहे. आयटीओ येथील छठ घाट पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. यमुना नदीलगतचा परिसर अतिशय संवेदनशील आहे. या भागात सुमारे 41 हजार लोक राहतात. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील 6 जिल्ह्यांमध्ये बाधित लोकांसाठी सुमारे 2700 तंबू बनवण्यात आले आहेत. या तंबूंमध्ये राहण्यासाठी आतापर्यंत 27 हजार लोकांनी नोंदणी केली आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीfloodपूरArvind Kejriwalअरविंद केजरीवालAmit Shahअमित शाहRainपाऊसriverनदी