शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

दिल्ली मद्य धोरण! 'या' नेत्यांसाठी बनले गळ्यातील फास; आतापर्यंत 16 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 17:26 IST

Delhi Liquor Policy Case: दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडी आणि सीबीआयने अनेकांना ताब्यात घेतले आहे.

CBI Arrested K Kavitha: दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्यामुळे आम आदमी पक्ष (AAP) अडचणीत आला आहे. याप्रकरणी आपचे अनेक नेते तुरुंगात आहेत. अशातच, सीबीआयने गुरुवारी (11 एप्रिल) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि बीआरएस नेत्या के. कविता यांनाही अटक केली. विशेष म्हणजे, यापूर्वी कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केले होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि ED ने दिल्ली मद्य धोरणाबाबत गुन्हा दाखल केला असून, या धोरणाचा वापर करुन मनी लाँड्रिंग करण्यात आली का, याचा तपास ईडी करत आहे. 

अरविंद केजरीवालयाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांना गेल्या महिन्यात ईडीने त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर झडती घेतल्यानंतर अटक केली होती. पक्षाचे संपर्क प्रभारी विजय नायर हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने काम करत असल्याचा आरोप या एजन्सींनी केला आहे.

के कवितातेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या आणि भारत राष्ट्र समिती (BRS) च्या विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांनाही गेल्या महिन्यातच ईडीने त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. ईडीने कविता, या साउथ लॉबीचा भाग असल्याचा आरोप केला असून, आप नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा दावाही केला आहे. 

संजय सिंहआपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दीर्घ चौकशीनंतर 4 ऑक्टोबर 2023 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांची अटकही या प्रकरणात महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संजय सिंग सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. 

मनीष सिसोदियादिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक केली होती. 9 मार्च 2023 रोजी ईडीने या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून सिसोदिया यांना पुन्हा एकदा अटक केली. ईडीच्या आरोपपत्रात त्यांच्यावर उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मितीमध्ये अतिरिक्त प्रक्रियात्मक सहभागाचा, काही मद्य कंपन्यांच्या फायद्यासाठी त्यात बदल केल्याचा आरोप आहे.

विजय नायरआपचे संपर्क प्रभारी विजय नायर यांना सीबीआयने सप्टेंबर 2022 मध्ये अटक केली होती. ईडीने त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्यावर आरोप केले होते. ईडीने नायर यांच्यावर ‘साऊथ ग्रुप’चा मध्यस्थ असल्याचा आरोप केला आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्यावर AAP च्या गोवा विधानसभा प्रचारादरम्यान लाच म्हणून मिळालेल्या पैशांची लाँड्रिंग केल्याचा आरोप केला.

वरील नेत्यांशिवाय, साउथ लॉबीचे सदस्य राघव मंगुटा(या प्रकरणातील माफीचे साक्षीदार), वड्डी रिटेलचे मालक अमित अरोरा, अकाली दलाचे माजी आमदार गौतम मल्होत्रा ​​यांचा मुलगा, अरबिंदो ग्रुपचे प्रवर्तक पी शरद रेड्डी, साऊथ ग्रुपचे सदस्य, अभिषेक बोनपल्ली, बुकीबाबू गोरंटला, रेकॉर्ड इंडियाचे प्रादेशिक प्रमुख बिनॉय बाबू, चौरिएट प्रॉडक्शनचे संचालक राजेश जोशी आणि इतर अनेकांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :AAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागdelhiदिल्ली