नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपा आणि आप अशा राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. दिल्लीत पुन्हा आपचीच सत्ता येणार, असं बऱ्याच ओपिनियन पोलमधून समोर आलं होतं. परंतु भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीत यंदा भाजपा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तवला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा 41हून अधिक जागा जिंकेल, असं भाकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी वर्तवले आहे.सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. तुकडे तुकडे गँगने रास्ता रोको केल्यानं अर्थव्यवस्थेला फटका बसला, तरीही भाजपा 41 जागा जिंकेल. शाहीन बाग आंदोलन आणि अर्थव्यवस्थेला मरगळ आलेली असतानाही भाजपा दिल्लीत विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पार्टी आणि भाजपा आमने-सामने आलेले आहेत. त्यातच भाजपा या आंदोलनाचा राजकीय दृष्टिकोनातून फायदा उचलत असल्याचा आरोप आपच्या अरविंद केजरीवालांनी केला आहे.
Delhi Elections: स्वामींची भविष्यवाणी; भाजपा 41 जागा जिंकेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 22:10 IST