शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Results : दिल्लीमध्ये मतदान कमी, पण नोटा वाढले! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 10:06 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच टक्क्यांनी मतदान कमी झाले असले तरी नोटामध्ये मात्र वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच टक्क्यांनी मतदान कमी झाले असले तरी नोटामध्ये मात्र वाढ झाली आहे. एकूण 70 मतदारसंघांमध्ये 43 हजार 108 लोकांनी नोटाचे बटण दाबून मतदारसंघातील उमेदवारांना नाकारले.मटियाला मतदारसंघात सर्वाधिक 1602 लोकांनी नोटाला पसंती दिली आहे.

नवी दिल्ली -  दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच टक्क्यांनी मतदान कमी झाले असले तरी नोटामध्ये मात्र वाढ झाली आहे. एकूण 70 मतदारसंघांमध्ये 43 हजार 108 लोकांनी नोटाचे बटण दाबून आपापल्या मतदारसंघातील उमेदवारांना नाकारले आहे. 

2015 च्या निवडणुकीत 62.59 मतदान झाले होते. त्यावेळी आपने 67 जागांवर विजय मिळवला होता आणि 35 हजार 924 लोकांनी नोटाला पसंती दिली होती. यंदा त्यात शुन्य दशांश एक टक्क्यांनी वाढ झाली आहे. मटियाला मतदारसंघात सर्वाधिक 1602 लोकांनी नोटाला पसंती दिली आहे. येथून आपचे गुलाब सिंग यांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे मटिया महल मतदारसंघात आपचे शोएब इक्बाल यांनी भाजपाच्या रविंद्र गुप्ता यांचा तब्ब्ल 50 हजार मतांनी पराभव केला. येथे सर्वात कमी 216 नोटांची नोंद झाली आहे. एकूण 70 पैकी सहा मतदारसंघामध्ये एक हजाराहून अधिक मतं ही नोटाला पडली आहेत. 

दिल्लीत भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी रविवारी रामलीला मैदानावर होणार आहे. आप आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून केजरीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून, त्याचा भव्य सोहळा करण्याचे आपने ठरविले आहे. राजधानीत राहणारा आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. यशानंतर आपमध्ये उत्साह आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन केजरीवाल यांनी याच मैदानावर केले होते. त्यामुळे तिथे शपथविधी सोहळा आहे.

देशाच्या राजधानीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर केजरीवाल यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा वाढलेला आहे. विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या चेहऱ्यांमध्ये केजरीवाल यांचे स्थान बळकट होत आहे. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणाऱ्यांमध्ये अरविंद केजरीवाल यांना महत्त्व प्राप्त होणार आहे. राजकीय विश्लेषकांचे मते, राष्ट्रीय राजकारणात अरविंद केजरीवाल यांना प्रमुख विरोधी चेहरा म्हणून उभारण्यास आणखी काही काळ लागेल. सध्या अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला निवडणूक आयोगाकडून प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता आहे. 2017 मध्ये पंजाबमध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून आपने ओळख निर्माण केली. मात्र 'आप'च्या राष्ट्रीय राजकारणाला गोवा विधानसभा आणि मागील दोन लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. या दोन्ही निवडणुकीत आपला अपयश आलं. 

महत्त्वाच्या बातम्या

China Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेनं 'कोरोना'ला दिलं नवं नाव

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे

ठाकरे सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका किती? ताळमेळच लागेना

यंदा अतिरिक्त २२ सुट्ट्या!; पाच दिवस आठवड्याचा असाही फायदा

 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल