शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Results : भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने भोवली, अमित शाह यांनी चूक कबूल केली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 21:09 IST

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा केली आहे.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भाजपाने या पराभवाबाबत चिंतन करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या पराभवाची नेमकी कारणमीमांसा केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाचे नुकसान झाल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी भाजपाच्या दिल्लीत झालेल्या पराभवाबाबत भाष्य केले आहे. भाजपाच्या नेत्यांनी देशातील गद्दार आणि भारत-पाकिस्तान मॅच यासारखी विधाने करता कामा नये होती, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. दिल्ली निवडणुकीतील प्रचारादरम्यान, भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारो... असे वक्तव्य केले होते. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांची जेवढी चर्चा केली गेली, त्या तुलनेत राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा झाली नाही, असा दावाही अमित शाह यांनी केला. दरम्यान, काही निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणजे जनतेचा पक्षावरील विश्वास उडाला असे होत नाही. महाराष्ट्रात आम्ही जिंकलो होतो. हरयाणात आम्ही केवळ ६ जागा गमावल्या.  नक्कीच झारखंडमध्ये आमचा पराभव झाला. तर दिल्लीच आम्ही आधीच पराभूत झालो होतो. मात्र दिल्लीत  आमच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढली, असेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून, ७० सदस्य संख्या असलेल्या दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्या आपने ६२ जागा जिंकून दणदणीत यश मिळवले. तर भाजपाला केवळ ८ जागाच जिंकत आल्या होता.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAmit Shahअमित शहाBJPभाजपाPoliticsराजकारण