शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Delhi Election Results : ...म्हणून केजरीवालांच्या शपथविधीला इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 9:36 AM

आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं जाणार नाही.

ठळक मुद्देकेजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं जाणार नाही.दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात येणार.रामलीला मैदानावर भव्य संख्यने सामान्य नागरिकांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं जाणार नाही. दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात येणार असून त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे. आपचे नेते गोपाळ राय यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच 'दिल्लीकरांनो... तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी जरूर या' असं निमंत्रण अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्य दिल्लीकरांना ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून केलं आहे.

'जेव्हा भारतमातेच्या प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. भारताच्या प्रत्येक नागरिकाला चांगले उपचार मिळतील. सुरक्षा व सन्मान महिलांमध्ये आत्मसन्मान निर्माण करेल. युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी त्यांच्या घामाचे मूल्य मिळेल. प्रत्येक भारतीयाला मुलभूत सुविधा मिळतील. धर्म, जात सोडून प्रत्येक  भारतवासी भारताला पुढे घेऊन जाईल तेव्हाच अमर तिरंगा आकाशात अभिमानाने फडकेल. तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. त्याला आशीर्वाद देण्यासाठी रामलीला मैदानावर सकाळी सहा वाजेपर्यंत जरुर या' असं निमंत्रण केजरीवालांनी व्हिडीओतून दिलं आहे. 

रामलीला मैदानावर भव्य संख्येने सामान्य नागरिकांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे. दिल्लीतील जनतेने आपला विजय मिळवून दिला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करता येईल. हा सोहळा सर्वांसाठी खुला राहणार असल्याची माहिती गोपळ राय यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपने या सोहण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

दिल्लीत भाजपाला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी रविवारी रामलीला मैदानावर होणार आहे. आप आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून केजरीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून, त्याचा भव्य सोहळा करण्याचे आपने ठरविले आहे. राजधानीत राहणारा आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. यशानंतर आपमध्ये उत्साह आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन केजरीवाल यांनी याच मैदानावर केले होते. त्यामुळे तिथे शपथविधी सोहळा आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मोदीजी, तुमचं गिफ्ट घेऊन जा; व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं शाहीन बागेची पंतप्रधानांना साद

उमेदवारी देताय? आधी गुन्ह्यांचे तपशील जाहीर करा!

निर्भया : चौघांचे नवे ‘डेथ वॉरन्ट’ पुन्हा लांबणीवर

‘एल्गार’चा तपास एनआयएमार्फतच

 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीElectionनिवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप