शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Delhi Election 2020 : 'आप'ने ६२ जागांसह जिंकली दिल्ली, पण भाजपाला ६३ जागांवर आनंदाची किल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 11:48 IST

Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'विरुद्ध भाजपाने 8 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. 2015 च्या तुलनेत यावेळी भाजपाच्या पाच जागा वाढल्या आहे

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर आम आदमी पक्षाच्या विजयाचे सेलिब्रेशन आता काही प्रमाणात शांत झाले आहे. 'आप'ने दिल्लीत 70 पैकी 62 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र भाजपासाठी या पराभवात देखील आनंदाची बातमी दडली आहे. एकूण 63 जागांवर भाजपासाठी ही निवडणूक आनंद देणारी ठरली आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'विरुद्ध भाजपाने 8 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. 2015 च्या तुलनेत यावेळी भाजपाच्या पाच जागा वाढल्या आहे. 2015 मध्ये भाजपाला केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी पराभव झाला असला तरी हिंदुत्वावादी भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. 

भाजपाची मतांची टक्केवारी वाढलीदिल्लीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र भाजपाने यावेळी मतांच्या टक्केवारीत अनेक मतदार संघांवर मजबूत पकड निर्माण केली आहे. दिल्लीत 70 पैकी 63 जागांवर भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. यापैकी 20 जागांवर 2015 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी मतं वाढली आहेत. भाजपाची मतांची टक्केवारी नजफगड मतदार सर्वाधिक वाढली आहे. येथे मागच्या वेळच्या तुलनेत 21 टक्के मतं वाढली आहेत.

'आप'ला मतांच्या टक्केवारीत काही प्रमाणात फटकाआम आदमी पक्षाने निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. परंतु, मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास 38 मतदार संघात 'आप'च्या मतांची टक्केवारी घसरली आहे. त्याचवेळी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत पाच मतदार संघात आपची टक्केवारी 10 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. मुस्तफाबाद मतदार संघात गेल्या वेळच्या तुलनेत आपच्या मतांची टक्केवारी 23 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. याव्यतिरिक्त 32 मतदार संघात मतांची टक्केवारी वाढली आहे.

मुस्लीम बहुल मतदार संघात 'आप'ला फायदाविधानसभा निवडणुकीत मुस्लीम बहुल भागातील मतदार संघात आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी झपाट्याने वाढली आहे. मुस्तफाबाद, मटिया महल, चांदनी चौक, बल्लीमरान आणि सीलमपूर या मतदार संघात आपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मुस्तफाबाद मतदार संघात काँग्रेसची मतं 'आप'कडे वळली आहेत. काँग्रेसला मुस्तफाबाद येथे 2015 च्या तुलनेत 28.8 टक्के कमी मतं मिळाली आहेत.

दिल्लीत 'आप'ला भरभरून मतंदिल्लीकरांनी विधानसभा निवडणुकीत आपवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आपला एकूण 49 लाख 74 हजार 522 मते मिळाली. तर भाजपाला 35 लाख 75 हजार 430 मते मिळाली आहेत. त्याचवेळी काँग्रेसला केवळ 3 लाख 95 हजार 924 मतं मिळाली आहेत. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाcongressकाँग्रेसdelhiदिल्ली