शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Delhi Election Result: काँग्रेसला मोठा धक्का, 63 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 09:36 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यंदाही भोपळाही फोडता आला नाही.

ठळक मुद्दे70 पैकी 62 जागांवर आम आदमी पार्टी विजयीकाँग्रेसच्या 63 उमेदवारांचे डिपॉझिट जप्तपूनम आझाद यांनाही आपले डिपॉझिट वाचविता आले नाही.

नवी दिल्ली : दिल्लीकरांनी विधानसभेच्या 70 पैकी 62 जागांवर आम आदमी पार्टीला विजयी केले.  या विधानसभा निवडणुकीत भाजपाला आठ ठिकाणी विजय मिळाला, तर काँग्रेसला यंदाही भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे काँग्रेसला आतापर्यंतचा हा मोठा धक्का बसला आहे. निकालाची आकडेवारी पाहता काँग्रेसला पाच टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या 63 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात दिल्लीत 15 वर्षे सरकार चालवणाच्या काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. काँग्रेसचे तीन उमेदवार अरविंद सिंह लवली (गांधीनगर), देवेंद्र यादव (बादली) आणि अभिषेक दत्त (कस्तुरबानगर) यांनी या निवडणुकीत आपले डिपॉझिट वाचविले आहे.

दिल्लीत काँग्रेसने पहिल्यांदाच राष्ट्रीय जनता दलासोबत हातमिळवणी करत निवडणूक लढविली होती. 66 जागांवर काँग्रेसने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तर चार जागा सहकारी पक्षाला सोडल्या होत्या. जर, निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी 1/6 (16.6%) टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना डिपॉझिट म्हणून जमा केलेली रक्कम जप्त केली जाते. काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना पाच टक्क्यांहून कमी मते मिळाली असल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, दिली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा यांच्या कन्या शिवानी चोपडा या कालकाजी मतदार संघातून निवडणूक लढवत होत्या. मात्र, त्यांनाही जास्त मते मिळाली नसल्याने त्यांचेही डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे. याशिवाय,  विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांची मुलगी प्रियंका सिंह यांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे. 

काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद सुद्धा संगमविहार जागांवर निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, त्यांनाही आपले डिपॉझिट वाचविता आले नाही. पूनम आझाद यांना फक्त 2604 मते म्हणजेच 2.23 टक्के मिळाली. बल्लीमरानमधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री हारून युसूफ महज यांनाही फक्त 4.73 टक्के मते मिळाली आहेत. निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार पाहता अनेक उमेदवार निवडून येतील अशी अनेकांना आशा होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला मोठे अपयश आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Election: दिल्लीत आम आदमीचेच राज्य!

Delhi Election : आपच्या आमदारावर जीवघेणा हल्ला; कार्यकर्त्याचा मृत्यू

Delhi Election: केजरीवालांच्या प्रतिमासंवर्धनाची यशस्वी कहाणी

Delhi Election: विरोधकांना नवचैतन्य ही भाजपसाठी धोक्याची घंटा

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकcongressकाँग्रेसAAPआपBJPभाजपा