शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 09:46 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. नागरिकता संशोधन कायद्यासाठी भाजपाने दबाव टाकला होता.

ठळक मुद्देसीएएची मागणी अकाली दलानेच केली होती.पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार होत असलेले हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि बौद्धांना भारताचे नागरीकत्व देण्याचे आम्ही स्वागत करतो.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेनंतर भाजपासोबत सर्वाधिक काळ असलेल्या अकाली दलाने साथ सोडली असून २१ वर्षे जुनी युती तुटली आहे. शिरोमणि अकाली दलाने(शिअद बादल) निवडणुकीपूर्वी भाजपाशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकता संशोधन कायद्यासाठी अकाली दलावर भाजपाने दबाव टाकला होता. दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, सीएएवर भूमिका घेतल्याशिवाय आम्ही विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये अकाली दल नेहमी भाजपासोबत निवडणूक लढवितो. जर आम्ही आवाज उठवू शकत नाही तर निवडणूक लढविण्यात काही अर्थ नाही. 

कोणताही अकाली दलाचा नेता अपक्ष निवडणूक लढविणार नाही. केवळ निवडणूक न लढण्याचा निर्णय झाला आहे. युतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांना घ्यायचा असल्याचेही सिरसा यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय नाही तर सामाजिक युती आहे. पंजाबमध्ये शांती आणि भाऊबंध टिकविणारे ही युती आहे, असेही ते म्हणाले. मात्र, भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. 

Delhi Election: केजरीवालांविरोधात भाजपाने उभा केला उमेदवार; दुसरी यादी जाहीर

दिल्लीत भाजपाने निवडणूकपूर्व सर्व्हे केला; घबाडच सापडले पण...Delhi opinion poll 2020 : दिल्ली आपचीच; केजरीवाल पुन्हा पडणार भाजपाला भारीदिल्ली विधानसभा: आपने 15 आमदारांचे तिकीट कापले; 70 उमेदवारांची यादी एकाचवेळी जाहीर 

सीएएची मागणी अकाली दलानेच केली होती. मात्र, त्यामध्ये कोणत्या एका धर्माला काढण्याचे कधीच म्हटले नव्हते. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार होत असलेले हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि बौद्धांना भारताचे नागरीकत्व देण्याचे आम्ही स्वागत करतो. यामध्ये मुस्लिमांनाही सहभागी करण्यात यायला हवे, असेही सिरसा म्हणाले. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलArvind Kejriwalअरविंद केजरीवाल