‘दिल्ली निवडणूक मुक्त वातावरणात पार पाडणार’

By Admin | Updated: January 17, 2015 02:26 IST2015-01-17T02:26:42+5:302015-01-17T02:26:42+5:30

दिल्ली विधानसभेची निवडणूक मुक्त आणि योग्य वातावरणात पार पाडण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे १९ वे मुख्य निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांनी शुक्रवारी पदभार सांभाळल्यानंतर स्पष्ट केले.

'Delhi election to be held in free environment' | ‘दिल्ली निवडणूक मुक्त वातावरणात पार पाडणार’

‘दिल्ली निवडणूक मुक्त वातावरणात पार पाडणार’

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक मुक्त आणि योग्य वातावरणात पार पाडण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे १९ वे मुख्य निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांनी शुक्रवारी पदभार सांभाळल्यानंतर स्पष्ट केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही काय करणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे, असे ते येथील ‘निर्वाचन सदनात’ संवाद साधताना म्हणाले. सर्वोत्कृष्ट ते द्यायचे हेच निवडणूक आयोगाचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावण्याचा आमचा प्रयत्न असेल. निवडणूक व्यवस्थापनाचा दर्जा सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा माझा वैयक्तिक पातळीवर प्रयत्न असेल. २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस असून त्या दिवशी देशभरात इलेक्ट्रॉनिक मतदार नोंदणी व्यवस्थापन यंत्रणा (ईआरएमएस) जारी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरातील मतदार यादी आणि मतदारांबाबत तपशीलवार माहिती बघणे त्यामुळे शक्य होईल.

Web Title: 'Delhi election to be held in free environment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.