शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election 2025: दिल्लीत 70 जागांसाठी आज मतदान, 699 उमदेवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 05:56 IST

Delhi voting updates: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणात असून, आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत होत आहे. 

Delhi Assembly Election 2024: तिरंगी लढत होत असलेल्या दिल्लीत आज ७० जागांसाठी मतदान होत आहे. बुधवारी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू होऊन सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. दिल्लीतील मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ६९९ उमेदवारांच्या भवितव्याचा कौल आज मतदान यंत्रातून देतील. आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर भाजप आणि काँग्रेसनेही दिल्लीत सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी १३,७६६ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी आपल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे २५ वर्षांहून अधिक काळ दिल्लीतील सत्तेतून बाहेर असलेल्या भाजपने यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचे दिसत आहे. 

आम आदमी पक्षाचे दिल्लीत सरकार येण्यापूर्वी काँग्रेसकडे १५ वर्ष दिल्लीत सत्ता होती. पण, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे. 

१.५६ कोटी मतदार

५ फेब्रुवारी रोजी १.५६ कोटी मतदार १३,७६६ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ८३.७६ लाख पुरुष, ७२.३६ लाख महिला आणि १,२६७ तृतीयपंथी मतदार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी घरपोच मतदान सुविधेअंतर्गत ७,५५३ पात्र मतदारांपैकी ६,९८० मतदारांनी आधीच मतदान केले आहे.  

मतदान शांततेत पार पडण्यासाठी कडक बंदोबस्त

निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी खबरदारी घेतली आहे. यासाठी सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या २२० तुकड्या, दिल्ली पोलीस विभागातील ३५,६२६  अधिकारी आणि कर्मचारी आणि १९००० होमगार्ड विविध मतदान केंद्रावर आणि शहरात तैनात करण्यात आले आहेत. 

३००० मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. तिथे कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया पार पडताना पोलीस ड्रोनच्या मदतीनेही नजर ठेवणार आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस