शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सरकार स्थापनेपूर्वीच भाजप कामाला; यमुनेच्या सफाईचे काम सुरू, मोठमोठ्या मशीन पोहोचल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:53 IST

Delhi Election 2025 : मोठमोठ्या मशीन लावून यमुना स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत यमुना नदीची स्वच्छतेवरुन भाजप आणि आपमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता येताच यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्यात भाजपची सत्ता येताच यमुनेच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. नवीन सरकारच्या स्थापनेपूर्वीच उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या सूचनेनुसार मोठमोठ्या मशीन लावून यमुना स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.

स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रे यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी आधुनिक मशिन्स वापरल्या जात आहेत. यामध्ये 4 स्किमर मशीन, 2 वीड हार्वेस्टिंग मशीन आणि एक डीटीयू मशीनचा समावेश आहे. सध्या यमुना स्वच्छ करण्यासाठी 7 आधुनिक यंत्रांसह मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या पूर आणि पाटबंधारे विभागाचे मुख्य अधिकारी नवीन चौधरी यांना यमुनेच्या सुरुवातीच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत दोन प्रकारचे कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. रविवारपासून पहिल्या कृती आराखड्याचे काम सुरू झाले असून, त्याअंतर्गत सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे.

प्रथम दिल्लीतील वजिराबाद ते ओखलापर्यंत यमुना नदीत पसरलेला घनकचरा बाहेर काढला जाईल. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला शहरातील औद्योगिक युनिट्स नाल्यांमध्ये घाण पाणी सोडणार नाहीत याची खात्री करण्यास सांगितले आहे. दरम्यान, यमुनेत किती कचरा पसरला आहे, याबाबत अद्याप कोणतीही निश्चित आकडेवारी नाही. त्यामुळे या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी किती वेळ लागेल, हे काम सुरू झाल्यानंतरच कळेल. यमुना पूर्णपणे नाला बनली आहे, त्यामुळे नदीला पूर्ववत होण्याची थोडा वेळ लागणार आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआपriverनदी