Delhi Election 2020 : आक्षेपार्ह शेरेबाजी करणाऱ्या 'आप' कार्यकर्त्यावर संतप्त अलका लांबा यांनी उगारला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 12:46 PM2020-02-08T12:46:02+5:302020-02-08T12:48:17+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला गालबोट

Delhi Election 2020 : Congress candidate Alka Lamba tries to slap an AAP worker | Delhi Election 2020 : आक्षेपार्ह शेरेबाजी करणाऱ्या 'आप' कार्यकर्त्यावर संतप्त अलका लांबा यांनी उगारला हात

Delhi Election 2020 : आक्षेपार्ह शेरेबाजी करणाऱ्या 'आप' कार्यकर्त्यावर संतप्त अलका लांबा यांनी उगारला हात

Next

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दिल्लीतील एका मतदान केंद्राजवळ आपच्या एका कथित कार्यकर्त्याने काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केली. त्यामुळे संतापलेल्या लांबा यांनी या कार्यकर्त्यावर हात उगारला. या प्रकारामुळे पररिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. 



काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेल्या अलका लांबा ह्या मजनूं का टिला परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर आल्या होत्या. त्यावेळी संबंधित आपच्या कार्यकर्त्याने त्यांना कँग्रेसचा बिल्ला उतरवण्यास सांगितले. त्यावरून दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. त्याचवेळी या कार्यकर्त्याने अलका लांबा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यामुळे संतापलेल्या अलका लांबा यांनी या कार्यकर्त्याच्या दिशेने धाव घेत त्याच्यावर हात उगारला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत आपच्या या कार्यकर्त्याला बाजूला नेले.  

Delhi Election 2020 Live Updates : माझं अंतर्मन सांगतंय, भाजपाच दिल्ली जिंकणार! मनोज तिवारींचा दावा

दिल्ली विधानसभा : उपमुख्यमंत्री सिसोदियांनी पाठवली भाजप खासदाराला कायदेशीर नोटीस

Delhi Election: दिल्लीतील मतदारांना मोफत सेवा, कॅब कंपनीची सामाजिक बांधिलकी

या प्रकारानंतर अलका लांबा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ''मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोलींग बूथवर आले होते. त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मला अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. त्याने उच्चारलेले शब्द मी सांगू शकत नाही. आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता एका महिलेला अर्वाच्च शिविगाळ करवत होता. 

Web Title: Delhi Election 2020 : Congress candidate Alka Lamba tries to slap an AAP worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.