ग्रेटा थनबर्ग 'टूलकिट' प्रकरणी मोठी कारवाई; बेंगळुरूतून दिशा रवि अटकेत

By देवेश फडके | Published: February 14, 2021 11:55 AM2021-02-14T11:55:06+5:302021-02-14T11:59:04+5:30

पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग (greta thunberg) टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत बेंगळुरू येथील पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवि या तरुणीला अटक केली आहे. फ्रायडे फॉर फ्युचर कॅपेनची दिशा ही एक संस्थापक सदस्य आहे. ०४ फेब्रुवारी रोजी ट्विटर टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

delhi cyber cell arrested climate activist disha ravi regarding greta thunberg tool kit case | ग्रेटा थनबर्ग 'टूलकिट' प्रकरणी मोठी कारवाई; बेंगळुरूतून दिशा रवि अटकेत

ग्रेटा थनबर्ग 'टूलकिट' प्रकरणी मोठी कारवाई; बेंगळुरूतून दिशा रवि अटकेत

Next
ठळक मुद्देग्रेटा थनबर्ग प्रकरणी बेंगळुरूतून दिशा रवि अटकेतदिल्ली पोलिसांच्या सायबर सेलची मोठी कारवाईटूलकिट प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्यांची नोंद

नवी दिल्ली : पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग (greta thunberg) टूलकिट प्रकरणी दिल्लीपोलिसांनी मोठी कारवाई करत बेंगळुरू येथील पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवि या तरुणीला अटक केली आहे. फ्रायडे फॉर फ्युचर कॅपेनची दिशा ही एक संस्थापक सदस्य आहे. ०४ फेब्रुवारी रोजी ट्विटर टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. (delhi cyber cell arrested climate activist disha ravi regarding greta thunberg tool kit case)

बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरात दिशा वास्तव्याला असून, याच भागातून पोलिसांनी तिला अटक केली आहे. दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासह इंटरनेट सेवा बंद केली होती. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूलकिट ट्विट केले होते. मात्र, काही वेळानंतर ते डिलीट करण्यात आली.

"न्यायालयात न्याय मिळत नाही, तेथे जाणे पश्चाताप करून घेण्यासारखे आहे"

दिल्ली पोलिसांनी गुगल आणि अन्य बड्या सोशल मीडिया कंपन्यांना टूलकिट प्रकरणात उल्लेख करण्यात आलेल्या ई-मेल आणि यूआरएलसंदर्भात माहिती मागवत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. ग्रेटाने टूलकिटचा उल्लेख करत मदत करायची असेल, तर या टूलकिटचा वापर करावा, असे आवाहन केले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात या टूलकिटचा संबंध खलिस्तानी संघटनेशी असल्याचे समोर आले आहे. 

"केरळमध्ये CAA लागू होणार नाही"; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले स्पष्ट

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यानच्या हिंसाचाराचा आरोप असलेल्या दीप सिद्धू आणि इक्बाल सिंग यांना पोलिसांनी अटक केली असून, या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा खलिस्तानशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात गुप्तचर विभाग आणि गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

Web Title: delhi cyber cell arrested climate activist disha ravi regarding greta thunberg tool kit case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.