शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 06:33 IST

ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केल्याचा आराेप

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : शंभर कोटींच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे ‘सूत्रधार’ दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली.

केजरीवाल यांना राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल एस.व्ही. राजू आणि झोएब होसैैन यांनी, तर केजरीवाल यांच्या वतीने अभिषेक सिंघवी, रमेश गुप्ता आणि विक्रम चौधरी यांनी तीन तास जोरदार युक्तिवाद केला. केजरीवाल यांनी ईडीचे अधिकारी कपिल राज आणि सत्यव्रत यांची हेरगिरी करणारा १५० पानांचा अहवाल त्यांच्या घरी सापडल्याचा आरोप ईडीने केला.हा केवळ शंभर कोटींचाच घोटाळा नसून लाच देणाऱ्यांनी कमावलेल्या नफ्यातून सहाशे कोटींचाही समावेश असल्याचा दावा एस. व्ही. राजू यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करताना दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी व आपचे कार्यकर्ते. पोलिसांनी त्यांना अटक करुन अन्यत्र सोडले.

 

  • अटक चुकीची : अभिषेक सिंघवी

- निवडणुकीपूर्वी पक्षाच्या अव्वल नेतृत्वाला केलेली अटक चुकीची आहे. - या प्रकरणातील ८० टक्के आरोपींनी केजरीवाल यांचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.- अटकेचा अधिकार व अटकेची गरज समतुल्य नाही. असा दावा सिंघवी यांनी केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्रीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय