'वोट फ्रॉम होम'! 'या' शहरातील वयोवृद्धांना करता येणार घरबसल्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 08:52 AM2019-11-07T08:52:42+5:302019-11-07T08:58:45+5:30

निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी अनेकदा वयोवृद्ध व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत प्रकृतीच्या कारणामुळे पोहचता येत नाही.

delhi citizen over 80 years of age would vote from home | 'वोट फ्रॉम होम'! 'या' शहरातील वयोवृद्धांना करता येणार घरबसल्या मतदान

'वोट फ्रॉम होम'! 'या' शहरातील वयोवृद्धांना करता येणार घरबसल्या मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्लीतील दिव्यांग आणि 80 वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे.मतदारांना पोस्टल बॅलेट पेपरने मतदान करता येणार आहे. मतदारांसाठी एक नवं अ‍ॅप देखील यावेळी लाँच करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी अनेकदा वयोवृद्ध व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत प्रकृतीच्या कारणामुळे पोहचता येत नाही. मात्र आता 'वोट फ्रॉम होम' च्या माध्यमातून वयोवृद्धांना घरबसल्या मतदान करण्याची संधी मिळणार आहे. दिल्लीतील दिव्यांग आणि 80 वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी मतदान केंद्रावर जाण्याची आता गरज नाही. या मतदारांना पोस्टल बॅलेट पेपरने मतदान करता येणार आहे. 

दिल्लीतील जवळपास 1.44 कोटी मतदार विधानसभा निवडणुकीच्या वेळी घरबसल्या आपल्या जवळच्या मतदार केंद्रावर मतदानासाठी किती मोठी रांग आहे आणि आतापर्यंत किती लोकांनी मतदान केलं आहे हे देखील जाणून घेऊ शकतात. दिल्ली निवडणूक आयोगाचे अधिकारी रणबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर निवडणुक आयोगाची एक वरिष्ठ टीम आली होती. यामध्ये आयोगाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्लीतील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांशी, पोलिसांशी आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांशी एक बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीसंबंधीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. 

दिल्लीतील बैठकीत उपस्थित असलेल्या निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवनी 80 वर्षांवरील मंडळी आणि दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीतील नावे हायलाईट आणि व्हेरिफाय करायला सांगितली. तसेच मतदारांसाठी एक नवं अ‍ॅप देखील यावेळी लाँच करण्यात येणार आहे. 'बूथ अ‍ॅप' असं या अ‍ॅपचं नाव असून यामध्ये सर्व मतदारांना घरबसल्या आपल्या जवळच्या मतदार केंद्रावर मतदानासाठी किती मोठी रांग आहे आणि आतापर्यंत किती लोकांनी आतापर्यंत मतदान केलं यासारखी माहिती मिळणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मतदार केंद्रावर यावेळी जी व्यक्ती मतदान करण्यासाठी पुढे जाईल. तेव्हा हेल्प डेस्कजवळ मतदाराचं ओळखपत्र स्कॅन केलं जाईल. यावरून अ‍ॅपवर कोणत्या व्यक्तीने मतदान केलं आहे याची माहिती मिळेल. तसेच मतदार केंद्रावर मतदानासाठी आलेल्या लोकांची संख्या समजण्यासाठी हे अ‍ॅप फायदेशीर ठरणार आहे. नव्या बूथ अ‍ॅपच्या माध्यमातून मतदार केंद्रावरील रजिस्टर मतदारांपैकी किती जणांनी मतदान केलं आहे याचे लाईव्ह अपडेट मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. 

 

Web Title: delhi citizen over 80 years of age would vote from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.