Delhi MLA: कॅबिटनेटमध्ये आमदारांच्या पगार वाढीला मंजुरी, आता मिळेल इतकी पगार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:04 PM2021-08-03T14:04:01+5:302021-08-03T14:04:26+5:30

Delhi Cabinet: दिल्ली कॅबिनेटने आमदारांची पगार आणि भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

Delhi Cabinet approves salary hike for MLAs | Delhi MLA: कॅबिटनेटमध्ये आमदारांच्या पगार वाढीला मंजुरी, आता मिळेल इतकी पगार...

Delhi MLA: कॅबिटनेटमध्ये आमदारांच्या पगार वाढीला मंजुरी, आता मिळेल इतकी पगार...

Next
ठळक मुद्दे आता आमदारांना 30 हजार रुपये पगार आणि इतर भत्ते मिळून 90 हजार रुपये मिळतील.

नवी दिल्ली:दिल्ली कॅबिनेट (Delhi Cabinet) ने मंगळवारी आमदारांच्या वेतन आणि इतर भत्यांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यानुसार, आता दिल्लीतील आमदारांना 30 हजार रुपये प्रति महीना बेसिक वेतन मिळेल. सध्या दिल्लीतील आमदारांचे वेतन 12 हजार रुपये आहे.

90 हजार होणार पगार
दिल्ली कॅबिनेटने मंगळवारी मंजुर केलेल्या प्रस्तावानुसार, आमदारांचे वेतन आणि इतर भत्ते मिळून त्यांना महिन्याकाठी 90 हजार रुपये मिलणार आहेत. सध्या दिल्लीतील आमदारांचे वेतन आणि भत्ता 54 हजार रुपये प्रति महीना आहे. कॅबिनेटने मंजुर केलेल्या भत्त्यानुसार, आता आमदारांना बेसिक सॅलरी 30,000 रुपये, मतदारसंघ भत्ता- 25,000 रुपये, सचिवालय भत्ता- 15,000 रुपये, वाहन भत्ता- 10,000 रुपये आणि टेलीफोन- 10,000 रुपये मिळेल.

सर्वात कमी पगार दिल्लीतील आमदारांची
दिल्ली सरकार सरकारच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, दिल्लीतील आमदारांची पगार इतर राज्यातील आमदारांच्या पगारापेक्षा कमी आहे. अनेक भाजपा, काँग्रेस आणि स्थानिक पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमधील आमदारांची पगार दिल्लीतील आमदारांच्या पगारापेक्षा खूप जास्त आहे. पण, आता दिल्ली सरकारने पगार वाढीचा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर आमदारांना काहीचा दिलासा मिळणार आहे.

Web Title: Delhi Cabinet approves salary hike for MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.