नवी दिल्ली - दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रोस्टेशन जवळ झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा आत्मघाती हल्ला करणारा कथित दहशतवादी डॉ. उमर नबीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो सुसाइड बॉम्बिंगबाबत बोलताना दिसतो. हा व्हिडिओ स्फोटाच्या काही दिवस आधी रेकॉर्ड करण्यात आला होता. या व्हिडिओतून डॉ. उमरचा हेतू काय होता हे दिसून येते. १० नोव्हेंबरला संध्याकाळी दिल्लीत हा दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात आतापर्यंत १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेक जण जखमी आहेत त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.
सुसाइड बॉम्बिंगवर काय म्हणाला उमर?
या व्हिडिओत उमर म्हणतो, आत्मघाती हल्ल्यात सर्वात मोठा मुद्दा हा आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती समजून जातो, त्याला कुठल्या वेळी, कुठे मरायचे आहे तो इतक्या खतरनाक मानसिकतेत गेलेला असतो. तो स्वत:ला अशा स्थितीत ठेवतो, जिथे मृत्यू हाच त्याचा एकमेव मार्ग असतो. परंतु वास्तव असेही आहे कुठल्याही लोकशाही अथवा मानवी व्यवस्थेत या विचाराला स्वीकारले जात नाही. कारण हे जीवन, समाज आणि कायदा तिन्हीच्या विरोधात आहे असं त्याने म्हटलं. ABP न्यूजनं हा व्हिडिओ समोर दाखवला आहे.
स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली
१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. एलएनजेपी रुग्णालयात आणखी दोन जखमींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लुकमान (५०) आणि विनय पाठक (५०) अशी ओळख पटली आहे असं सोमवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या गुरुवारी बिलाल नावाच्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची संख्या १३ वर पोहोचली होती. आता या २ मृत्यूंसह स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे, तर अनेकांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, भारतीय तपास यंत्रणा स्फोटाची सखोल चौकशी करत असून रोज नवनवीन खुलासे यातून समोर येत आहेत. या प्रकरणी डॉ. शाहीन आणि तिचा भाऊ डॉ. परवेज यांच्यासह अनेकांना अटक झाली आहे. अल फलाह यूनिवर्सिटीशी याचे धोगेदोरे जोडलेले आहेत. याठिकाणी अनेक डॉक्टर तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. आतापर्यंत ३ कारही जप्त करण्यात आल्या आहेत.
Web Summary : Before the Delhi blast near Red Fort, a video of alleged terrorist Dr. Umar Nabi surfaced, discussing suicide bombing. The blast killed 15; investigations continue with arrests linked to Al Falah University.
Web Summary : दिल्ली के लाल किले के पास विस्फोट से पहले, कथित आतंकवादी डॉ. उमर नबी का एक वीडियो सामने आया, जिसमें आत्मघाती बम विस्फोट पर चर्चा की गई। विस्फोट में 15 लोगों की मौत हो गई; अल फलाह विश्वविद्यालय से जुड़े गिरफ्तारियों के साथ जांच जारी है।