Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी देशभरात मोठ्या प्रमाणावर दहशतवादविरोधी मोहिम सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान, आज आणखी एक मोठे यश मिळाले असून, जम्मू-काश्मीरमधून आणखी एका डॉक्टर दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
कुलगाममधून डॉक्टर तजामुल अटकेत
कुलगाम जिल्ह्याचा रहिवासी डॉ. तजामुल हा श्रीनगर येथील एसएमएचएस रुग्णालयात कार्यरत होता. पोलिसांनी त्याला करण सिंह नगर परिसरातून ताब्यात घेतले. डॉ. तजामुलवर आरोप आहे की, तो दिल्लीस्फोटातील प्रमुख आरोपी डॉ. उमर मोहम्मद याच्याशी संपर्कात होता आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित मॉड्यूलचा भाग होता. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा त्याची सखोल चौकशी करत आहेत.
डॉ. सज्जाद मल्ला नंतर दुसरी अटक
याआधी 11 नोव्हेंबर रोजी पुलवामा येथून डॉक्टर सज्जाद अहमद मल्ला याला अटक करण्यात आली होती. सज्जाद हा दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. उमर मोहम्मदचा जवळचा मित्र असल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही अटकांमुळे तपास यंत्रणांना या दहशतवादी डॉक्टर नेटवर्क बद्दल महत्त्वाचे धागेदोरे मिळत आहेत.
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
जमात-ए-इस्लामीवर मोठी कारवाई
कुलगाम पोलिसांनी बुधवारी (12 नोव्हेंबर) जाहीर केले की, प्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामी (JeI) विरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. 200 हून अधिक ठिकाणी छापेमारी करून अनेक संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. या कारवाईचा उद्देश दिल्ली स्फोटाशी जोडलेल्या दहशतवादी नेटवर्कचा शोध घेणे हा आहे.
देशभर छापेमारी, 1500 ताब्यात
दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात सुरक्षा दलांनी आक्रमक मोहीम सुरू केली आहे. 1,500 हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांनी सांगितले की, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी घाटीतील विविध जिल्ह्यांमध्ये औचक तपासण्या सुरू आहेत. याशिवाय, पीओकेमध्ये राहणाऱ्या आणि UAPA अंतर्गत गुन्हेगार असलेल्या व्यक्तींच्या संपत्तीवरही शोधमोहीम राबविण्यात आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या काही महत्त्वाच्या कारवाया
5 नोव्हेंबर- सहारनपूर (उत्तर प्रदेश) मधून दहशतवादी डॉक्टर अदील अटकेत.
7 नोव्हेंबर - जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग येथील रुग्णालयातून AK-56 रायफल आणि दारुगोळा जप्त.
8 नोव्हेंबर - फरीदाबादच्या अल-फलाह मेडिकल कॉलेजमधून शस्त्रास्त्रे आणि स्फोटक साहित्य जप्त.
11 नोव्हेंबर - पुलवामातील डॉ. सज्जाद मल्ला अटकेत.
12 नोव्हेंबर - कुलगाममधून डॉ. तजामुलला अटक.
Web Summary : Following the Delhi blast near Red Fort, police arrested Dr. Tajamul in Kulgam, linked to Dr. Umar and Jaish-e-Mohammad. Raids continue across India, with over 1500 detained and properties searched, revealing a network of doctors involved in terrorism.
Web Summary : लाल किले के पास दिल्ली विस्फोट के बाद, पुलिस ने डॉ. उमर से जुड़े डॉ. ताजमुल को कुलगाम से गिरफ्तार किया। भारत में छापे जारी हैं, 1500 से अधिक हिरासत में, आतंकवाद में शामिल डॉक्टरों का नेटवर्क उजागर।