"जनता म्हणतेय 'फिर खाएंगे'..."; केजरीवालांवर मोदींचा हल्लाबोल, मोठ्या विजयासाठी सांगितले 2 टार्गेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:05 IST2025-01-22T16:05:18+5:302025-01-22T16:05:55+5:30

पंतप्रधान म्हणाले, दिल्लीतील पक्ष संघटनेची ताकद मोटी आहे. प्रत्येक बूथवर तीन ते चार पिढ्यांचे कार्यकर्त्ये आहेत. ही शक्ती यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून देईल...

Delhi assembly election People are saying Phir Khaaenge Modi attacks Kejriwal, says 2 targets for a big victory | "जनता म्हणतेय 'फिर खाएंगे'..."; केजरीवालांवर मोदींचा हल्लाबोल, मोठ्या विजयासाठी सांगितले 2 टार्गेट!

"जनता म्हणतेय 'फिर खाएंगे'..."; केजरीवालांवर मोदींचा हल्लाबोल, मोठ्या विजयासाठी सांगितले 2 टार्गेट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विजयावर विश्वास व्यक्त केला आहे. 'मेरा बूथ सबसे मजबूत' कार्यक्रमांतर्गत हजारो बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी यांनी त्यांना 'मोठ्या विजयासाठी' दोन टार्गेट दिली आहेत. आम आदमी पक्षाच्या 'फिर आएंगे केजरीवाल' या घोषणेवर निशाणा साधताना पंतप्रधान म्हणाले, हे म्हणत आहेत 'पुन्हा येतील'. पण जनता म्हणतेय, 'पुन्हा खातील' (फिर खाएंगे). यावेळी त्यांनी शीशहलवरही निशाणा साधला.

पंतप्रधान म्हणाले, दिल्लीतील पक्ष संघटनेची ताकद मोटी आहे. प्रत्येक बूथवर तीन ते चार पिढ्यांचे कार्यकर्त्ये आहेत. ही शक्ती यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून देईल. या निवडणुकीत केवळ विजय पुरेसा नाही, तर प्रत्येक बूथवर दोन टार्गेट ठेवून काम करावे लागणार आहे. पहिले टर्गेट अथवा लक्ष्य असेल, मतदानाचे सर्व रेकॉर्ड मोडणे, गेल्या १० वर्षात जेवढे झाले त्यापेक्षा अधिक मतदान आपल्या बूथवर व्हायला हवे. तर दुसरे ध्येय म्हणजे, भाजपला प्रत्येक बूथवर ५०% हून अधिक मतदान कसे मिळेल? यासाठी बूथमधील सर्व नागरिकांची मने जिंकणे, त्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतील.

जनता म्हणते, पुन्हा खातील-पुन्हा खातील...-
पंतप्रधान नरेंद्र मोदीअरविंद केजरीवाल यांच्या घोषणेवर निशाणा साधताना म्हणाले, "ते म्हणत आहेत, पुन्हा येणार पुन्हा येणार, लोक म्हणतायत पुन्हा खातील-पुन्हा खातील. त्यांचा आवाज येताच, जनतेतूनही आवाज येतो, 'पुन्हा खातील-पुन्हा खातील' (फिर खाएंगे-फिर खाएंगे). आपल्या हुथवरील सर्वच कार्यकर्त्यांकडे 'आपदा' वाल्यांची संपूर्ण माहिती आहे. आधी त्यांची पोल-खोल करा आणि नंतर आपली कामे सांगा. घरा-घरात जा आणि त्यांना समजावून सांगा की आपण काय करणार आहोत."

"झोपडपट्टीवासीयांना हे काय म्हणाले होते? घरे बांधणार, पण बघितलेही नाही. आता पुन्हा म्हणत आहेत घरे बांधणार, तुम्हाला 10 वर्षांत कधी वेळ मिळाला नाही. आज नव्या गप्पा मारत आहात. आपण गरिबांसाठी जी घरे बांधी आहेत, त्याचे फोटो जनतेला दाखवा," अशी सूचनाही पंतप्रधान मोदी यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केली.

Web Title: Delhi assembly election People are saying Phir Khaaenge Modi attacks Kejriwal, says 2 targets for a big victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.