मंदिर आणि गुरुद्वारांमधील पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये; अरविंद केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:00 IST2024-12-30T15:00:01+5:302024-12-30T15:00:31+5:30

Delhi Assembly Election 2025 : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांनी मोठी घोषणा केली आहे.

Delhi Assembly Election 2025: Rs 18,000 per month for all priests in temples and gurdwaras; Arvind Kejriwal's announcement | मंदिर आणि गुरुद्वारांमधील पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये; अरविंद केजरीवालांची घोषणा

मंदिर आणि गुरुद्वारांमधील पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये; अरविंद केजरीवालांची घोषणा

Delhi Assembly Election 2025 : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज (30 डिसेंबर) एक मोठी घोषणा केली. पुजारी-ग्रंथी सन्मान योजनेंतर्गत दिल्लीतील सर्व मंदिरांमध्ये काम करणारे पुजारी आणि गुरुद्वारांमध्ये काम करणाऱ्या ग्रंथींना(पुजारी) दरमहा 18 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. 

पुजारी-ग्रंथी सन्मान योजना 
या योजनेची घोषणा करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, हे देशात पहिल्यांदाच घडत आहे. दिल्लीत आम्ही अनेक गोष्टी केल्या, चांगल्या शाळा बांधल्या, चांगली रुग्णालये उभारली, महिलांसाठी बस प्रवास मोफत केला. आता आम्ही राज्यात पुरोहितांसाठी सन्मान योजना सुरू करत आहोत. अनेक शतकांपासून पुजारी देवाची पूजा करतात, आपली परंपरा चालवत आले आहेत. आतापर्यंत आपण पुजाऱ्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. आता या योजनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत.  

उद्यापासून नोंदणी सुरू
केजरीवाल पुढे म्हणाले, या योजनेसाठी उद्यापासून, म्हणजेच 31 डिसेंबरपासून नोंदणी सुरू होईल. मी उद्या हनुमान मंदिरात जाऊन तेथील पुजाऱ्यांची नोंदणी करुन योजनेची सुरुवात करेन, त्यानंतर दिल्लीतील आपचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते मंदिरे आणि गुरुद्वारांमध्ये जाऊन पुजाऱ्यांची नोंदणी सुरू करतील.

भाजपने रोखण्याचा प्रयत्न करू नये
यावेळी केजरीवालांनी भाजपवर निशाणा साधला. मी भाजपला हात जोडून विनंती करतो की, त्यांनी महिला सन्मान योजना बंद करण्यासाठी पोलीस पाठवले, पण ते थांबवू शकले नाहीत, त्यांनी संजीवनी योजना बंद करण्याचा प्रयत्न केला, पण थांबवू शकले नाहीत, आता त्यांनी पुजारी-ग्रंथी योजना रोखण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही यापूर्वी अनेक पापे केली, आता भाजपचे आणखी पाप करू नये, असा इशारा त्यांनी दिला. 
 

Web Title: Delhi Assembly Election 2025: Rs 18,000 per month for all priests in temples and gurdwaras; Arvind Kejriwal's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.