अवध ओझा निवडणुकीच्या रिंगणात; मनीष सिसोदियांच्या मतदारसंघातून लढणार, सिसोदियांच काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:39 IST2024-12-09T14:38:58+5:302024-12-09T14:39:40+5:30

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी AAP ने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.

Delhi Assembly Election 2025 Awadh Ojha will contest from Manish sisodia constituency | अवध ओझा निवडणुकीच्या रिंगणात; मनीष सिसोदियांच्या मतदारसंघातून लढणार, सिसोदियांच काय?

अवध ओझा निवडणुकीच्या रिंगणात; मनीष सिसोदियांच्या मतदारसंघातून लढणार, सिसोदियांच काय?

Delhi Assembly Election 2025 : दिल्लीत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (AAP) तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 20 उमेदवारांची नावे सामील आहेत. विशेष म्हणजे, यावेळी 'आप'नेदिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांचा मतदारसंघ बदलला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आपने यंदा मनीष सिसोदिया यांना पटपडगंज मतदारसंघाऐवजी जंगपुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच 'आप'मध्ये दाखल झालेले UPSC शिक्षक अवध ओझा (Avadha Ojha) यांना सिसोदियांच्या पटपडगंजमधून तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय राखी बिरला यांचाही मतदारसंघ बदलण्यात आला आहे. 

यादीतील तीन नावांची बरीच चर्चा
या यादीत असे तीन चेहरे आहेत, ज्यांना तिकीट कुठून मिळणार यावरुन बरीच चर्चा होती. पहिले नाव होते शिक्षणतज्ञ अवध ओझा यांचे. ते निवडणूक लढवणार की नाही, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र आता ते मनीष सिसोदिया यांच्या पटपडगंजमधून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. सिसोदिया सलग तीन वेळा या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत ते अत्यंत कमी मताधिक्याने विजयी झाले होते.

दुसरे नाव प्रवेश रतन यांचे आहे. प्रवेश रतन हे जाटव समाजातील आहेत. ते भाजपमधून 'आप'मध्ये आले आहेत. त्यांनी भाजपच्या तिकिटावर पटेल नगर (राखीव) जागेवरून मागील निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा आपचे राजकुमार आनंद यांनी पराभव केला. आता राजकुमार आनंद यांनी आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या यादीत तिसरे नाव जितेंद्र सिंह शांती यांचे आहे. शांती यांनी शाहदरा येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना आपच्या रामनिवास गोयल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी गोयल यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.

'आप'च्या उमेदवारांची दुसरी यादी

1. नरेला- दिनेश भारद्वाज
2. तिमारपुर- सुरेंद्र पाल सिंह बिट्टू
3. आदर्श नगर- मुकेश गोयल
4. मुंडका- जसबीर कराला
5. मंगोलपुरी- राकेश जाटव धर्मरक्षक
6. रोहिणी- प्रदीप मित्तल
7. चांदनी चौक- पुनर्दीप सिंह साहनी (सैबी)
8. पटेल नगर- प्रवेश रतन
9. मादीपुर- राखी बिड़लान
10. जनकपुरी- प्रवीण कुमार
11. बिजवासन- सुरेंद्र भारद्वाज
12. पालम- जोगिंदर सोलंकी
13. जंगपुरा- मनीष सिसौदिया
14. देवली- प्रेम कुमार चौहान
15. त्रिलोकपुरी- अंजना पारचा
16. पटपड़गंज- अवध ओझा
17. कृष्णा नगर- विकास बग्गा
18. गांधी नगर- नवीन चौधरी (दीपू)
19. शाहदरा- पदमश्री जितेंदर सिंह शंटी
20. मुस्तफाबाद- आदिल अहमद खान

यापूर्वी आम आदमी पक्षाने आपल्या पहिल्या यादीत 11 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. या यादीत असे सहा उमेदवार होते, जे नुकतेच काँग्रेस आणि भाजपमधून 'आप'मध्ये सामील झाले आहेत.

आपची पहिली यादी

1. छतरपूर- ब्रह्मसिंह तन्वर 
2. किरारी-अनिल झा- 
3. विश्वास नगर-दीपक सिंगला 
4. रोहतास नगर- सरिता सिंग
5. लक्ष्मी नगर-बीबी त्यागी 
6. बदरपूर- राम सिंह 
7. सीलमपूर-झुबेर चौधरी 
8. सीमापुरी- वीर सिंग धिंगन
9. घोंडा- गौरव शर्मा 
10. करावल नगर- मनोज त्यागी 
11. मतियाला- सोमेश शौकीन

Web Title: Delhi Assembly Election 2025 Awadh Ojha will contest from Manish sisodia constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.