शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

"पुतळा यमुनेत बुडवून काढला, तर तोही आजारी पडला"; अमित शाह यांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 19:14 IST

"आज अरविंद केजरीवाल यांचा पुतळा यमुनेत बुडवून काढला (डुबकी लगावली), तर तोही आजारी पडला," असे शाह यांनी म्हटले आहे...

दिल्ली विधानसभा निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. नेतेमंडळींचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप चांगलेच तीव्र होताना दिसत आहेत. यातच आज केंद्रीय गृह मंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी युमान नदी स्वच्छतेच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. "आज अरविंद केजरीवाल यांचा पुतळा यमुनेत बुडवून काढला (डुबकी लगावली), तर तोही आजारी पडला," असे शाह यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, आज नवी दिल्लीचे भाजप उमेदवार प्रवेश वर्मा अरविंद केजरीवाल यांचे कटआऊट घेऊन यमुना नदीवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी कटआऊटलाला यमुनेत बुडवून काढले (डुबकी लगावली). या कटआऊटवर ‘सॉरी मैं फेल हो गया’, असे लिहिण्यात आले होते. अमित शाह यांनी सभेला संबोधित करताना, याच प्रसंगावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

पुढील तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे भाजपचे आश्वासन - खरेतर, भाजप यमुना नदी स्वच्छतेच्या मुद्द्यावर जोर देत, आप सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहे. याशिवाय, आपण यमुना नदी स्वच्छ करू शकलो नाही, हे खुद्द अरविंद केजरीवाल यांनीही मान्य केले आहे. तसेच, पुन्हा सत्तेत आल्यास यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासनही त्यांनी जनतेला दिले आहे. याच बरोबर, भाजपनेही पुढील तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन दिल्लीकरांना दिले आहे.

अण्णांचे नाव घेत केजरीवालांवर हल्लाबोल - सभेला संबोधित करताना अमित शहा पुढे म्हणाले, केजरीवाल यांनी सुशासन हा शब्दच संपवला आहे. निवासी भागातील दारूची दुकाने बंद करू, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, मंदिरे आणि गुरुद्वारांजवळ दारूची दुकाने उघडून त्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला. बनावट मोहल्ला क्लिनिक उघडले, ऑपरेशन्स आणि एमआरआयसाठी कुठे जायचे? सत्तेवर आल्यास, १० लाख रुपयांपर्यंतचा उपचार भाजप सरकार करेल." एवढेच नाही तर," आपण दिल्लीतील भ्रष्टाचार संपवू", अशी घोषणाही त्यांनी केली होती. आज अन्नांनाही वाईट वाटत असेल की, आपला एक चेला कसा निघाला, ज्याने एवढा भ्रष्टचार केला. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Amit Shahअमित शाहBJPभाजपाAAPआप