दुबई-जयपूर 'फ्लाइट हायजॅक', प्रवाशाच्या ट्विटने खळबळ; दिल्ली पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 07:23 AM2023-01-27T07:23:23+5:302023-01-27T07:24:17+5:30

दुबई-जयपूर विमानाच्या अपहरणाबद्दल खोटे ट्विट केल्याप्रकरणी दिल्लीत एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

delayed passenger falsely tweets dubai jaipur flight hijacked delhi police passenger arrested | दुबई-जयपूर 'फ्लाइट हायजॅक', प्रवाशाच्या ट्विटने खळबळ; दिल्ली पोलिसांनी केली अटक

दुबई-जयपूर 'फ्लाइट हायजॅक', प्रवाशाच्या ट्विटने खळबळ; दिल्ली पोलिसांनी केली अटक

googlenewsNext

दुबई-जयपूर विमानाच्या अपहरणाबद्दल खोटे ट्विट केल्याप्रकरणी दिल्लीत एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. ही घटना बुधवारची आहे. पोलीस उपायुक्त (विमानतळ) रवी कुमार सिंह यांनी सांगितले की, राजस्थानमधील नागौर येथील रहिवासी मोती सिंह राठौर खराब हवामानामुळे दुबई-जयपूर विमानाचा मार्ग बदलल्याने येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले.

विमान सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी लँड झाले होते आणि दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरम्यान प्रवासी मोती सिंह राठोड यांनी फ्लाइट हायजॅक असं ट्विट केलं. या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली होती.

प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल
प्रवासी मोती सिंह राठोड याला त्याच्या सामानासह विमानातून उतरवण्यात आलं आणि आवश्यक तपासणीनंतर विमानानं पुन्हा उड्डाण घेतलं. यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइटला उशीर झाल्यामुळे प्रवासी नाराज झाला होता याकारणानं त्यानं असं खोटं ट्विट केलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून राठोडला अटक करण्यात आली आहे.

विमानात लघुशंका कांड
सध्या विमान प्रवासा संबंधीच्या अनेक घटना आणि तक्रारी समोर येत आहेत. एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेची देशभर खूप चर्चा झाली आणि वादही झाली. आरोपीला विमान कंपनीने चार महिन्यांसाठी बंदी घातली आहे. २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये आरोपी शंकर मिश्रा याने मद्यधुंद अवस्थेत एका वृद्ध महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने या घटनेची लेखी तक्रार एअर इंडियाकडे केल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर ही घटना मीडियासमोर आली.

Web Title: delayed passenger falsely tweets dubai jaipur flight hijacked delhi police passenger arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :delhiदिल्ली