नाशिक-पुणे विमान सेवेचे आज विलंबाने उड्डाण
By Admin | Updated: July 7, 2015 22:56 IST2015-07-07T22:56:07+5:302015-07-07T22:56:07+5:30
नाशिक : हवाई नकाशावर आलेल्या नाशिकमध्ये दुसर्याच दिवशी विमानाचे टेक ऑफ विलंबाने होणार आहे. बुधवारी सकाळी ९.४५ वाजेऐवजी सकाळी ११ वाजता विमान पुण्याकडे झेपावणार आहे.

नाशिक-पुणे विमान सेवेचे आज विलंबाने उड्डाण
न शिक : हवाई नकाशावर आलेल्या नाशिकमध्ये दुसर्याच दिवशी विमानाचे टेक ऑफ विलंबाने होणार आहे. बुधवारी सकाळी ९.४५ वाजेऐवजी सकाळी ११ वाजता विमान पुण्याकडे झेपावणार आहे.ओझरच्या विमानतळावरून नाशिक ते पुणे विमान सेवा सुरू झाली असून, सोमवारी या सेवेला मुहूर्त लागला. मेहेर या सी प्लेन कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला होता. सोमवारी सेवेचा शुभारंभ विलंब झाला असला तरी, उद्घाटन सोहळ्यास अनेक राजकीय व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी हजर होते आणि सेवेचा शुभारंभाचा दिवस होता. मात्र बुधवारपासून ही सेवा नियमित सुरू होणे अपेक्षित असताना ८ जुलै रोजी विलंबाने म्हणजेच सकाळी ११ वाजता टेक ऑफ होणार आहे. कंपनीचे सहसंस्थापक सिध्दार्थ वर्मा यांनी त्यास दुजोरा दिला. सध्या या सेवेला बळकटी मिळण्यासाठी व्यवसायासाठी पोषक काही व्यक्तींना सहल म्हणून या माध्यमातून नेले जात असून, त्यामुळे सर्वांच्या सोयीने ११ वाजेची वेळ निश्चित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. एकदा सेवा नियमित सुरू झाली की, अडचण उद्भवणार नाही, असे सांगतानाच बुधवारी ७ प्रवाशांनी नांेदणी केल्याचे सांगितले. सदरची सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार अशी तीन दिवस चालणार आहे. आता शुक्रवारीही सकाळी ११ वाजताच टेक ऑफ होणे शक्य आहे.