अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त
By Admin | Updated: June 22, 2014 01:26 IST2014-06-22T01:26:58+5:302014-06-22T01:26:58+5:30
अमरनाथ यात्रेकरिता पोलीस बंदोबस्त कडेकोट करण्यात आला असून, येथे कुठलाही धोका नसल्याचा निर्वाळा पोलीस महासंचालक राजिंदर कुमार यांनी दिला आहे.

अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त
>जम्मू : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेकरिता पोलीस बंदोबस्त कडेकोट करण्यात आला असून, येथे कुठलाही धोका नसल्याचा निर्वाळा पोलीस महासंचालक राजिंदर कुमार यांनी दिला आहे.
येथील यात्रेकरिता सुरक्षिततेचे सर्व उपाय योजले आहेत, तसेच कुठल्याही अनिष्ट घटनेचे संकेत नाहीत, असे ते म्हणाले. यावर्षी ही यात्र 29 जूनपासून सुरू होत असून, ती 1क् ऑगस्टर्पयत चालणार आहे. यात्रेची पूर्व तयारी झाली असून भाविकांना अडचणी येऊ नयेत याची प्रशासन दक्षता घेत आहे.
(वृत्तसंस्था)