शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

इमरान खान यांच्या 'त्या' विधानामागे काँग्रेसचा डाव - संरक्षणमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 13:54 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्यामागे काँग्रेसचा डाव असू शकतो अशी शंका संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली - भारतात लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी आले तर चांगले राहील. कारण मोदींमुळे भारत-पाकिस्तानमध्ये शांततेसाठी सकारात्मक पाऊलं उचलता येतील या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्यामागे काँग्रेसचा डाव असू शकतो अशी शंका संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे. 

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीबाबत परदेशी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केलं होतं. काश्मीरचा वाद सोडविण्यासाठी पुन्हा भारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आले तर चांगले होईल असं इमरान खान यांनी म्हटलं होतं. मात्र नरेंद्र मोदी सरकारला हटविण्यासाठी पाकिस्तानसोबत मिळून काँग्रेसने हा डाव साधला असा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी केला आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत निर्मला सितारामन म्हणाल्या की, मला माहीत नाही पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी हे वक्तव्य का केलं असावं? काँग्रेसचे अनेक नेते पाकिस्तानात जात असतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी मदत करावी अशी मागणी करत असतात. ते नेते नरेंद्र मोदी यांनी हटविण्यासाठी पाकिस्तानची मदत असतात. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेलं विधानाने मला आश्चर्य झालं नाही. कदाचित हा काँग्रेसचा डाव असू शकतो. मात्र माझं हे वैयक्तिक मतं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

परदेशी पत्रकारांनी मागील आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी इस्लामाबाद येथे चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी भारतातील लोकसभा निवडणुकीबाबत आपल्याला काय वाटतं? असा प्रश्न इमरान खान यांना विचारला होता. त्यावेळी भारत-पाक या दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी आणि काश्मीर मुद्द्याचं निरसन करण्यासाठी निवडणुकीनंतर भारतात नरेंद मोदी पुन्हा पंतप्रधान बनले तर चांगले राहील असं वक्तव्य केलं होतं. 

तसेच भारत पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करु शकतो. १६ ते २० एप्रिल दरम्यान हा हल्ला होऊ शकतो असं पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेला आरोपही संरक्षणमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान