शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

म्यानमारमध्ये लष्कराचा पराभाव, आणखी एका शहरावर बंडखोरांचा ताबा...! 26 लाख लोक विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 11:40 IST

Myanmar Conflict : "सरकारी सैन्यासोबत 23 दिवस चाललेल्या लढाईत आम्ही विजय मिळवला आहे. सरकारी सैन्याचा पराभव करत आम्ही चीनला लागून असलेल्या लॅशियो शहरावर कब्जा केला आहे, असे मॅनमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने म्हटले आहे...

म्यानमारमध्ये लष्कराविरोधात जोरदार बंड सुरू आहे. ते थांबण्याचे नाव नाही. या बंडात म्यानमारच्या सैन्याला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. आता बंडखोरांनी चीन सीमेला लागून असलेल्या एक मुख्य सैनिकी तळावर कब्जा केल्याचे वृत्त आहे. हा म्यानमार सैन्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे. यासंदर्भात बोलताना, "सरकारी सैन्यासोबत 23 दिवस चाललेल्या लढाईत आम्ही विजय मिळवला आहे. सरकारी सैन्याचा पराभव करत आम्ही चीनला लागून असलेल्या लॅशियो शहरावर कब्जा केला आहे, असे मॅनमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने म्हटले आहे. 

बंडखोरांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या सैनिकांनी विजय मिळवला असून शत्रू सैनिकांना हटवले जात आहे. निवेदनात म्हणण्यात आले आहे की, स्थानिक लोकांनी शांतता पाळावी आणि नियमांचे पालन करावे. महत्वाचे म्हणजे, न्यूज पोर्टल म्यानमार नाऊने म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने लॅशियोमध्ये कब्जा केल्याची पुष्टी केली आहे.

म्यानमारमध्ये अनेक दिवसांपासून सुरू आहे गृह युद्ध -म्यानमारमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गृहयुद्ध सुरू आहे. म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी एका अशा अल्पसंख्याक बंडखोर गटांपैकी आहे, जो मॅनमारच्या सैनिकांना, ते आपला प्रदेश समजत असलेल्या भूभागातून बाहेर काढण्यासाठी लढत आहे.

यासाठी बंडखोरांनी एक आंदोलनही चालवले होते. ज्याच्या माध्यमाने त्यांनी जुंटाची सत्ता कमकुवत केली. यानंतर या लढाईचे पर्यवसान गृहयुद्धात झाले. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, या गृहयुद्धात म्यानमारचे अनेक लोक मारले गेले आहेत, तसेच 26 लाखहून अधिक लोक विस्थापितही झाले आहेत.

पराभव स्वीकारण्यास सैनिक तयार नाहीत -खरे तर म्यानमारमधील ही लढाई 2021 पासूनच सुरू झाली आहे. येथील अस्थायी लोकशाहीनंतर म्यानमारचे सैन्य 2021 मध्ये पुन्हा सत्तेवर आले. आता हे युद्ध संपूर्ण देशालाच उद्ध्वस्त करत आहे. मात्र म्यानमार सैनिक पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत.  जुंटाने आपल्या विरोधकांना दहशतवादी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यात हस्तक्षेप केला, मात्र त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही.

टॅग्स :Myanmarम्यानमारSoldierसैनिकwarयुद्ध