फसवणूक करणा-या मोदींचा बिहारमध्ये पराभव करुन शिक्षा द्या - जेठमलानी
By Admin | Updated: October 5, 2015 12:24 IST2015-10-04T14:11:54+5:302015-10-05T12:24:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना फसवलं आहे. त्यांना शिक्षा देण्यासाठी बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव केलाच पाहिजे असे सांगत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे.

फसवणूक करणा-या मोदींचा बिहारमध्ये पराभव करुन शिक्षा द्या - जेठमलानी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना फसवलं आहे. त्यांना शिक्षा देण्यासाठी बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव केलाच पाहिजे असे सांगत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय व गुजरातमधील भाजपाचे माजी खासदार राम जेठमलानी यांनी रविवारी मोदी व भाजपावर जोरदार टीका केली आहे. बिहारमध्ये मतदान करायचे असेल तर मी नितीश कुमार सरकारला मतदान करीन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जनतेला फसवल्याबद्दल भाजपाचा बिहारमध्ये पराभव करुन त्यांना शिक्षा दिली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपातून हकालपट्टी झालेल्या राम जेठमलांनी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार मोदींवर टीका केली आहे.