शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

माणूसकीची विटंबना... चक्क कचऱ्याच्या गाडीत कोरोना व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 10:59 IST

देशात कोरोनाची विदारक परिस्थिती पाहायला मिळत असून उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीच्या प्रवाहात अनेक मृतदेह वाहत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि वाचल्या आहेत.

ठळक मुद्देदेशात कोरोनाची विदारक परिस्थिती पाहायला मिळत असून उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीच्या प्रवाहात अनेक मृतदेह वाहत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि वाचल्या आहेत.

नालंदा - देशातील कोरोना संकटात पावलो पावली माणूसकीचे दर्शन घडत आहे, तर अनेक ठिकाणी माणूसकीचा बळी जात असल्याचंही निदर्शनास येत आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांचे मृतदेह एकाच गाडीत कोंबल्याचं आपण पाहिलं. रुग्णालयातून बिलाचा भरणा न केल्यामुळे मृतदेह तासन-तास नातेवाईकांच्या ताब्यात न दिल्याचंही आपण पाहिलं. आता, बिहारमधीलनालंदा येथे चक्का कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

देशात कोरोनाची विदारक परिस्थिती पाहायला मिळत असून उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीच्या प्रवाहात अनेक मृतदेह वाहत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि वाचल्या आहेत. कोरोनाबाधित मृतदेहांची अशी विटंबना होत  असून परिस्थिती धक्कादायक बनत आहे. रुग्णालय प्रशासन आणि नातेवाईकांमध्येही चांगलेच वाद होताना दिसत आहेत. कुठे इंजेक्शनची कमतरता, कुठे ऑक्सिजनची कमतरता, कुठे बेडची कमतरता दिसून येत आहे. त्यातच आता स्मशाभूमीतही रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं आहे. बिहारच्या नालंदा येथील सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  

महापालिकेच्या कचरा गाडीतून कोरानामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. पीपीई कीट घालून दोन व्यक्तींनी चक्क कचऱ्याच्या गाडीत हा मृतदेह टाकला होता. विशेष म्हणजे ही गाडी तीन चाकी रिक्षा सायकल होती. त्यामध्ये, एक व्यक्ती गाडीला पाठिमागून ढकलत होता, तर एकाने सायकलचा हँडल पुढे धरलेला दिसत आहे. मृतदेहाची अशी विटंबना झाल्याने सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी ही घटना घडली असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.   याप्रकरणी मी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे नालंदा सरकारी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सुनिल कुमार यांनी म्हटलंय.

टॅग्स :Biharबिहारnalanda-pcनालंदाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलGarbage Disposal Issueकचरा प्रश्न