दीपिका, सोनाक्षीने उत्तरप्रदेशातल्या गावामध्ये थाटला संसार

By Admin | Updated: September 1, 2016 13:27 IST2016-09-01T13:27:09+5:302016-09-01T13:27:09+5:30

बॉलिवुडच्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पादुकोण, जॅकलीन फर्नांडीस आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी आहे.

Deepika, Sonakshi, in the village of Uttar Pradesh, | दीपिका, सोनाक्षीने उत्तरप्रदेशातल्या गावामध्ये थाटला संसार

दीपिका, सोनाक्षीने उत्तरप्रदेशातल्या गावामध्ये थाटला संसार

ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. १ - बॉलिवुडच्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पादुकोण, जॅकलीन फर्नांडीस आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी आहे. या अभिनेत्रींनी उत्तरप्रदेशातील फारुखाबादमधील मुलांबरोबर विवाह उरकून त्यांच्याबरोबर संसार थाटला आहे. राकेश चंद्रा, साधू लाल आणि रमेश चंद्रा ही त्यांच्या पतीची नावे आहेत.
 
फारुखाबादच्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या संकेतस्थळावरुन या अभिनेत्रींचा विवाह झाल्याची माहिती समोर आली. अभिनेत्री राणी मुखर्जीचाही रामरुप नावाच्या व्यक्तीबरोबर विवाह झाल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्ष आयुष्यात राणीचा निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राबरोबर विवाह झाला आहे.
 
फारुखाबादच्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याने या तिघींच्या नावाने रेशनकार्ड जारी केले असून, त्यावर या अभिनेत्री विवाहीत असल्याची नोंद आहे. रेशन घोटाळयासाठी या अभिनेत्रीच्या नावांनी बनावट रेशन कार्ड तयार करण्यात आली.
 
साहेबगंज येथील समाजसेवक एका रेशन दुकानाशी संबंधित रेशनकार्ड धारकांच्या माहितीची सत्यता तपासत असताना हा घोटाळा समोर आला. रेशनकार्डावर या चौघा अभिनेत्रीचे वार्षिक उत्पन्न  फक्त १८ हजार रुपये दाखवण्यात आले आहे. फारुखाबादचे जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रकाश बिंदू यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 
 

Web Title: Deepika, Sonakshi, in the village of Uttar Pradesh,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.