सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घट
By Admin | Updated: August 20, 2014 01:42 IST2014-08-20T01:42:51+5:302014-08-20T01:42:51+5:30
सलग चौथ्या दिवशी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली.

सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घट
नवी दिल्ली : सलग चौथ्या दिवशी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली. सोन्याचा भाव आज 50 रुपयांनी घटून 28,55क् रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. भू-राजकीय तणावाच्या पाश्र्वभूमीवर जागतिक बाजारातही सोने-चांदीला ठोस मागणी मिळाली नाही. तथापि, चांदीचा भाव मात्र औद्योगिक संस्था आणि नाणो निर्मात्यांकडून ताजी मागणी झाल्याने 42क्ने सुधारून 43,33क् रुपये किलोवर बंद झाला.
बाजारातील सूत्रंनी सांगितले की, मागणीअभावी सोन्याच्या भावात ही घसरण दिसून आली. युक्रेनमधील तणावाचा जागतिक सराफा बाजारावर दबाव होता. तिकडे भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बळकट झाला. यामुळे आयात स्वस्त झाल्याने गुंतवणूकदारांनी समभाग बाजारात भांडवल टाकले. याचाही या मौल्यवान धातूला फटका बसला. न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव क्.56 टक्क्यांनी कमी होऊन 1,297.2क् डॉलर प्रतिऔंसवर राहिला.
दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 5क् रुपयांच्या घसरणीसह अनुक्रमे 28,55क् रुपये आणि 28,35क् रुपये प्रतिदहा ग्रॅमवर आला.