पुतळ्यांचा निर्णय मंगळवारी श्रीरामपूर नगरपालिका : निविदा व जागेबाबत होणार चर्चा
By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:23+5:302015-07-15T23:12:23+5:30
श्रीरामपूर : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्याचा निर्णय अखेर श्रीरामपूर नगरपालिकेने घेतला आहे.

पुतळ्यांचा निर्णय मंगळवारी श्रीरामपूर नगरपालिका : निविदा व जागेबाबत होणार चर्चा
श रीरामपूर : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्याचा निर्णय अखेर श्रीरामपूर नगरपालिकेने घेतला आहे.या पुतळ्यांसाठी नगरपालिकेने ई निविदा बोलाविल्या आहेत. त्यावर २१ जुलैस नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे. डॉ. आंबेडकरांचा पुतळा सध्या रेल्वेस्थानकाजवळील लुंबिनी बुद्ध विहारासमोर असलेल्या अर्धाकृती पुतळ्याच्याच जागेवर बसविण्यात येणार आहे. मात्र छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकात बसवायचा की अन्य जागेत यावरच बर्याच वर्षांपासून खल सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांचा शिवाजी चौकात पुतळा बसविण्याचा आग्रह आहे. तर नगरपालिकेचे कारभारी त्यास तयार नाहीत. त्याऐवजी सध्याच्या जागेत किंवा प्रस्तावित नेहरू भाजी मंडईच्या नव्या इमारतीच्या बाहेरील बाजूने पोलीस ठाण्याजवळ तसेच पीपल्स बँकेच्या भाजी मंडई शाखा अशा काही जागांच्या पर्यायावर चर्चा सुरू आहे. नगरपालिकेची पुतळ्यासाठी तयारी असली तरी हिंदुत्ववादी संघटनांचे जागेबाबत एकमत नसल्याने जागेचा पेच कायम आहे. या पुतळ्यासाठी दरवर्षी शिवजयंतीदिनी उपोषण आंदोलनेही करण्यात येत आहेत. नगरपालिकेची सर्वसाधारण मंगळवारी होत आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी पालिकेने यापूर्वीच ई निविदा बोलाविल्या आहेत. या प्राप्त निविदा तसेच छत्रपती पुतळ्याची जागा निश्चित करण्याबाबतचे दोन स्वतंत्र विषय ठेवण्यात आले आहेत. न्यायालय, केंद्र व राज्य सरकारांनी पुतळे बसविण्यास निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर या सभेत पुतळ्यांबाबत काय निर्णय होतो? याकडे श्रीरामपूरमधील शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)