शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीचा निर्णय १५ जुलैला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 06:41 IST

सरकारी नोकरी व शैक्षणिक प्रवेशांमध्ये मराठा समाजास आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयास अंतरिम स्थगिती द्यायची की नाही, यावर तातडीने सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले असून यासंबंधीची सुनावणी येत्या बुधवारी १५ जुलै रोजी होणार आहे.

नवी दिल्ली - सरकारी नोकरी व शैक्षणिक प्रवेशांमध्ये मराठा समाजास आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयास अंतरिम स्थगिती द्यायची की नाही, यावर तातडीने सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले असून यासंबंधीची सुनावणी येत्या बुधवारी १५ जुलै रोजी होणार आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या जूनमध्ये घटनात्मक वैध ठरविला होता. या प्रकरणी मूळ याचिकाकर्त्यांसह इतरांनी त्याविरुद्ध केलेली अपिले सर्वोच्च न्यायालयात जवळपास गेले वर्षभर प्रलंबितच आहेत.ही अपिले सर्वप्रथम सुनावणीस आली तेव्हा न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली नव्हती. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केली जाणारी सर्व कारवाई अपिलांवरील निकालांच्या अधीन असेल. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला निकाल किंवा मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, असे न्यायालयाने गेल्या वर्षी १२ जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळी स्पष्ट केले होते. या प्रकरणी वर्षभरातील १६ तारखांना जुजबी कामकाज झाले किंवा सुनावणी तहकूब करण्यात आली होती.यामुळे या अपिलांमध्ये पुढे काहीच प्रगती होऊ शकली नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी ही अपिले व त्यात केले गेलेले अनुषंगिक अर्ज सर्वोच्च न्यायालयात न्या. एल. नागेश्वर राव, न्या, हेमंत गुप्ता आणि न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठापुढे व्हर्च्युअल सुनावणीसाठी आली. दिल्लीत असलेल्या न्यायाधीशांपुढे देशाच्या विविध शहरांतून पक्षकारांच्या वकिलांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून युक्तिवाद केले. सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालास म्हणजेच पर्यायाने मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती द्यायची का नाही यावर एक आठवड्यानंतर म्हणजे १५ जुलै रोजी सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय