Decision to host matches soon - Shukla | स्थगित IPL सामने आयोजनाचा निर्णय लवकरच - शुक्ला

स्थगित IPL सामने आयोजनाचा निर्णय लवकरच - शुक्ला

आयपीएलचे स्थगित झालेले सामने पुन्हा कधी सुरू होणार? याविषयी चर्चा सुरू झाली असताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात सूतोवाच केले. ते म्हणाले, ‘आम्ही लवकरच भेटणार असून स्थगित करण्यात आलेले सामने पूर्ण कधी करता येतील, त्याविषयी निर्णय घेतला जाईल.

यासाठी आम्हाला स्पर्धा पूर्ण करण्याची कधी संधी मिळेल, तेदेखील पाहावे लागेल. तूर्तास सामने स्थगित करून एक चांगला निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याबाबत किंवा पुन्हा नियोजन करण्याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल. देशातली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी हा निर्णय हितकारक आहे,’ असे शुक्ला यांनी ट्विट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Decision to host matches soon - Shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.