शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

एलिव्हेटेड रेल्वेबाबत निर्णय मार्चमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 06:17 IST

मुंबईत होणा-या देशातील पहिल्या एलिवेटेड (उंचीवरुन) रेल्वे लाइनचे रंग रुप कसे असेल? याचा निर्णय नव्या वर्षात होणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मार्चपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : मुंबईत होणा-या देशातील पहिल्या एलिवेटेड (उंचीवरुन) रेल्वे लाइनचे रंग रुप कसे असेल? याचा निर्णय नव्या वर्षात होणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मार्चपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईत चर्चगेट - विरार आणि सीएसटी - पनवेल दरम्यान एलिवेटेड रेल्वे लाइन करण्याची घोषणा रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली होती. मुंबईची लाइफ लाइन समजल्या जाणाºया रेल्वे लाइनवरील प्रवाशांचा वाढता ताण कमी करणे आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुविधाजनक करणे, हा यामागचा उद्देश आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आगामी तीन महिन्यात आम्ही या प्रकरणी निर्णयाप्रत येऊ. या विषयावर सुरु असलेला अभ्यास फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याच्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, मुंबईतील लाइन्सवर निश्चितपणे ताण वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रस्ताव दिलासा देणारा आहे. पण, आमचा निर्णय याबाबतच्या अहवालावरुनच ठरणार आहे. जर अहवालात या लाइन्स बनविण्याबाबत सकारात्मक मत आले तर, सद्याच्या लाइन्सच्या अगदी वर न करता त्या लाइनसोबत बनविण्यात येतील. अर्थात, यासाठी प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग सद्याच्या रेल्वे स्टेशनमधूनच असेल. यासाठी शिड्या आणि लिफ्ट असेल. मुंबईतील लाइफ लाइन दुरुस्तीसाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी निर्देश दिले आहेत आणि नियमित समीक्षा बैठक घेत आहेत.एका अधिकाºयाने सांगितले की, गत रेल्वे बजेटमध्ये या लाइन्सचा उल्लेख होता. या लाइन मेट्रो नेटवर्कशी लिंक करण्यासोबतच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि प्रस्तावित नवी मुंबई एअरपोर्टशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. हा रेल्वेमार्ग जमीनीपासून किती उंचीवर असेल किंवा काही ठिकाणी जमीनीच्या खालीही असेल याबाबतची माहिती अभ्यास अहवालातून समोर येईल. त्याआधारे रेल्वे पुढचे पाऊल टाकणार आहे.>एका अधिकाºयाने सांगितले की, एक विचार असाही आहे की, दिल्ली एअरपोर्ट लाइनप्रमाणेच एलिवेटेड रोडवर विशेष रेल्वे एअरपोर्ट कनेक्टिव्हिटीसाठी चालविली जावी. यामुळे उत्पन्न काही प्रमाणात वाढविता येईल. पश्चिम आणि सेंट्रल रेल्वेचा असाही सल्ला आहे की, या प्रस्तावित एलिवेटेड लाइनवर एसी रेल्वेही चालविली जावी. याबाबत प्रारंभिक स्तरावर रेल्वे मंत्रालय सहमत आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई