शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार

By पूनम अपराज | Updated: September 22, 2020 17:55 IST

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत असणारे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेताच्या मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

ठळक मुद्देबिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

पटना -  बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत ते एनडीएचे उमेदवार बनू  शकतात असे वृत्त आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर गुप्तेश्वर पांडे राजीनामा देतील. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत असणारे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेताच्या मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाने ट्वीट केले आहे की, समाजवादी पार्टी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत कोणत्याही  पक्षाशी युती करणार नसून राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देईल.बिहारमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना, रविवारी भाजपने आपला जाहीरनामा तयार करण्याबाबत जनमत आणि सूचना मिळवण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला एक  ‘रथ’ रवाना केला होता. त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील मतदारांची मतं जाणून घेतली.

बिहार भाजपचे प्रमुख संजय जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांचा पक्ष सूचनेनुसार जाहीरनामा तयार करेल. ते पुढे  म्हणाले, "समाजातील सर्व घटकांचे मत जाणून घेण्यासाठी '6357171717' या नंबरवर टोल फ्री नंबर सुरू केला गेला आहे. लोक मिस कॉल देतील आणि त्यांना कॉल केले जातील. यानंतर ते राज्यातील सद्यस्थिती काय आणि आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात काय असले पाहिजे याबद्दल जनता सांगू शकते. ", इंडिया टीव्हीने अशी माहिती दिली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

 

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

 

Sushant Singh Rajput Case : 'क्या तुम्हारे पास माल है?' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश

 

नवीन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वीकारला पदभार

 

 

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूकPoliceपोलिसBJPभाजपाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMumbaiमुंबई