मंत्र्यांच्या वाहनाने धडक दिलेल्या युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:17+5:302015-02-14T23:52:17+5:30

नाशिक : घोटी-शिर्डी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी मंत्र्यांच्या वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या युवकाचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Death of a youth who hit the minister's vehicle | मंत्र्यांच्या वाहनाने धडक दिलेल्या युवकाचा मृत्यू

मंत्र्यांच्या वाहनाने धडक दिलेल्या युवकाचा मृत्यू

शिक : घोटी-शिर्डी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी मंत्र्यांच्या वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या युवकाचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घोटी शहरात पाव विक्र ीचा व्यवसाय करणार्‍या उमर फारूक शेख (४०) हा शुक्रवारी घोटी - शिर्डी रस्त्याने दुचाकीवरून घोटीला येत असताना धामनी गावाजवळ या दुचाकीस राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या शासकीय वाहनाने धडक दिली होती. या अपघातात उमर शेख हा फेकला गेला. त्याच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने त्याला उपचारार्थ नाशिकच्या खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत घोटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून चालक बाळ आमले यास अटक केली आहे. दरम्यान, या युवकाच्या निधनाचे वृत्त घोटी शहरात समजताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या युवकाच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. एक सुस्वभावी, मेहनती आणि मितभाषी अशी या युवकाची ओळख होती. (प्रतिनिधी)
---------------------------------------------
(छायाचित्र : १४ उमर शेख या नावाने मेलवरून टाकला आहे.)
-------------------------------------------------

Web Title: Death of a youth who hit the minister's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.