विजेचा धक्क्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:22+5:302015-07-31T22:25:22+5:30

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Death of woman with electric shocks | विजेचा धक्क्याने महिलेचा मृत्यू

विजेचा धक्क्याने महिलेचा मृत्यू

जेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
रामटेक : विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटगोवारी येथे गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
शीला राजेंद्र नाकतोडे (३५, रा. पटगोवारी, ता. रामटेक) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला घरी घरकाम करीत असताना नकळत तिचा स्पर्श विजेच्या तारेला झाला आणि तिला जोरदार धक्का लागला. त्यामुळे तिला लगेच रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: Death of woman with electric shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.