डेमो कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर

By Admin | Updated: June 9, 2014 00:38 IST2014-06-08T00:29:10+5:302014-06-09T00:38:05+5:30

नाशिक : महिंद्रा कंपनीच्या मॅग्झिमो या डेमो कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला ठार झाली असून, तिच्या पतीसह दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली़

Death of a woman in a demo car, both serious | डेमो कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर

डेमो कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर

नाशिक : महिंद्रा कंपनीच्या मॅग्झिमो या डेमो कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला ठार झाली असून, तिच्या पतीसह दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली़
विजया विजय मगर (३२) राहणार वाखारी पिंपळगाव ता़ देवळा असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती विजय मगर (३६) व पुतण्या राजेंद्र मगर (१४) हे गंभीर जखमी झाले आहेत़ याबाबत आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मगर कुटुंबीय मोटरसायकल (क्रमांक एमएच ४१ ई ६१३९) ने मुंबई-आग्रा महामार्गावरून आडगावकडून ओझरकडे जात होते़ आडगाव येथील देशमुख पेट्रोलपंपाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या मॅग्झिमो या डेमो कारने (एमएच १५, टीसी १२०१) त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली़ जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तत्पूर्वी विजया मगर यांचे निधन झाले होते़ कार चालकाविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Death of a woman in a demo car, both serious