आसाराम बापू प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा मृत्यू

By Admin | Updated: July 12, 2015 12:36 IST2015-07-12T12:35:15+5:302015-07-12T12:36:00+5:30

आसाराम बापू प्रकरणातील मुख्य साक्षीदार कृपाल सिंहचा शनिवारी रात्री उशीरा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Death of a witness in Asaram Bapu case | आसाराम बापू प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा मृत्यू

आसाराम बापू प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. १२ - आसाराम बापू प्रकरणातील मुख्य साक्षीदार कृपाल सिंहचा शनिवारी रात्री उशीरा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी कृपाल सिंह यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता व यात कृपाल सिंह  गंभीर जखमी झाले होते. 

आसाराम बापू यांचे एकेकाळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे कृपाल सिंह हे आसाराम बापूंविरोधात बलात्काराच्या गुन्ह्यातील प्रमुख साक्षीदार होते. कृपाल सिंह हे पिडीत मुलीच्या वडिलांकडे काम करायचे. आसाराम बापू यांच्याविरोधातील जोधपूर येथील बलात्कार प्रकरणात कृपाल सिंह हे मुख्य साक्षीदार होते. शुक्रवारी रात्री कृपाल सिंह यांच्यावर शाहजहाँपूर येथे अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या कृपाल सिंह यांचा शनिवारी मध्यरात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आसाराम बापूंविरोधात साक्ष देऊ नये यासाठी कृपाल सिंह यांना धमकी येत होत्या असा आरोप कृपाल सिंह यांच्या वडिलांनी केला आहे. आसाराम बापू बलात्कार प्रकरणातील ९ साक्षीदारांवर हल्ला झाला असून यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.  

 

Web Title: Death of a witness in Asaram Bapu case