बडगाममधल्या MI-17 हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकच्या जवानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 21:33 IST2019-02-27T21:32:39+5:302019-02-27T21:33:16+5:30
जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये आज सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले.

बडगाममधल्या MI-17 हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकच्या जवानाचा मृत्यू
नाशिक- जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये आज सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (वय 33) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी लखनऊच्या विजेता, दोन वर्षांची कन्या, आई-वडील, जर्मनीतील धाकटा बंधू असा परिवार आहे. नाशिकचा निनाद हा औरंगबाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) 26व्या कोर्सचा माजी विद्यार्थी होता. तिथून त्याची निवड पुणे येथे एनडीएत झाली आणि हेलिकॉप्टर पायलट झाला.
बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरच्या अपघातात निनादचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या. तसेच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती समोर आली होती.