पित्याने नदीत फेकल्याने तीन लहान मुलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 04:31 IST2018-08-07T04:31:25+5:302018-08-07T04:31:30+5:30

पत्नीशी झालेल्या भांडणानंतर मद्यपी पतीने पुलावरून नदीत फेकल्याने त्यांच्या तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी रात्री घडली.

The death of three little children is due to the father thrown into the river | पित्याने नदीत फेकल्याने तीन लहान मुलांचा मृत्यू

पित्याने नदीत फेकल्याने तीन लहान मुलांचा मृत्यू

हैदराबाद : पत्नीशी झालेल्या भांडणानंतर मद्यपी पतीने पुलावरून नदीत फेकल्याने त्यांच्या तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी रात्री घडली.
आंध्रातील नेल्लोर पोलिसांना दिगुआ मासापल्ली गावातील रहिवाशांनी खबर दिल्यानंतर पुनीत (५ वर्षे), संजय (३) आणि राहुल (२) या तीन मुलांची नीवा नदीच्या पात्रात तरंगणारी प्रेते सोमवारी सकाळी बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सरकारी इस्पितळात पाठविण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, व्यंकटेश्वरलु दारू पिऊन आल्यानंतर पत्नी अमरावती हिच्याशी नेहमी भांडत असे. या त्रासाला कंटाळून रविवारी सकाळी अमरावती तिन्ही मुलांना घऊन दिगुआ मासापल्ली येथे आपल्या माहेरी निघून गेली. रविवारी सायंकाळी व्यंकटेश्वरलु सासरी गेला व त्याने अमरावतीला मुलांना घेऊन घरी येण्यास बजावले. तिने नकार दिल्यावर रागारागाने तो तिन्ही मुलांना घेऊन निघाला. वाटेत त्याने पुन्हा मद्यपान केले व नंतर मुलांना नीवा नदीच्या पुलावरून पाण्यात फेकून दिले. (वृत्तसंस्था)

Web Title: The death of three little children is due to the father thrown into the river