तपोवनातील साधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By admin | Updated: August 11, 2015 23:22 IST
नाशिक : तपोवनातील साधुग्राममधील वृद्ध साधूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना मंगळवारी (दि़११) रात्री घडली़ मयत साधूचे नाव गौरीबाबा (७५) असे आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, तपोवनातील साधुग्राममध्ये गौरीबाबा हे काही दिवसांपूर्वीच वास्तव्यास आले होते़ मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांना छातीत त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले़ दरम्यान, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)