धावत्या रेल्वेतून उतरताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

By Admin | Updated: October 11, 2015 21:15 IST2015-10-11T21:11:02+5:302015-10-11T21:15:55+5:30

जळगाव : चुकीच्या रेल्वेत बसल्याने त्यातून उतरताना एकनाथ विठ्ठल बारी (४२, रा. एस.एम.आय.टी. कॉलेजजवळ, जळगाव) यांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला.

The death of the police personnel as they descended from the running train | धावत्या रेल्वेतून उतरताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून उतरताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

जळगाव : चुकीच्या रेल्वेत बसल्याने त्यातून उतरताना एकनाथ विठ्ठल बारी (४२, रा. एस.एम.आय.टी. कॉलेजजवळ, जळगाव) यांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला.
एकनाथ बारी हे संध्याकाळी जळगाव स्थानकावरुन भुसावळ-मुंबई पॅसेंजरमध्ये बसले. ही गाडी सुरु झाल्यानंतर आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी गाडी स्थानकाच्या बाहेर गेली असताना त्यांनी धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी रेल्वेखाली येऊन पायाला व पोटावर इजा होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना रेल्वे पोलीस व शहर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: The death of the police personnel as they descended from the running train