शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूचे भारतात पडसाद; केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:07 IST

श्रीनगरच्या क्लॉक टॉवरच्या आसपासही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे.

श्रीनगर - अमेरिका-इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जगभरात विरोध प्रदर्शन सुरू झाले आहे. भारतातही त्यांच्या मृत्यूचे पडसाद उमटले आहेत. भारतातील अनेक भागात शिया समुदायातील मुस्लिमांनी खामेनेई यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. रविवारी श्रीनगरपासून उत्तर प्रदेशातील लखनौपर्यंत शिया मुस्लीम समुदायातील लोक रस्त्यावर उतरले होते. या घटनेचा निषेध करत लोकांनी अमेरिका-इस्रायलविरोधात घोषणाबाजी केली.

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतात रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांमुळे सरकारने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आलेत. ज्या भागात लोकांनी उतरून खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल आक्रोश केला त्या लाल चौकातील परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. क्लॉक टॉवरच्या आसपासही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. सोबतच शाळा आणि कॉलेज पुढील २ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.

ठिकठिकाणी होतोय विरोध

इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी मिळताच भारतातील अनेक भागात विरोध प्रदर्शन पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथेही शिया समुदायातील लोकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. मौलाना कल्बे जवाब साहब यांनी लोकांना आवाहन करत रविवारी दुकाने बंद ठेवून ३ दिवस शोक पाळण्याचं आवाहन केले आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम येथेही लोक जमा झाले होते. पुलवामाच्या गंगू परिसरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून खामेनेई यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करत होते. देशातील उत्तरेकडे श्रीनगर, बांदीपोरा, अनंतनाग, गांदरबलसह अन्य भागात या घटनेचा विरोध केला जात आहे.

इराण घेणार बदला

इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात खामेनेई यांचा मृत्यू झाला. खामेनेई यांच्या मृत्यूने इराणमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ इराणने रविवारी घेतली. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने आखाती देश आणि इस्रायलमधील अमेरिकेच्या तळांवर टार्गेट हल्ला केल आहे. तर अमेरिकेकडूनही हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Khamenei Death: India Reacts, Government Takes Precautions

Web Summary : Following Ayatollah Khamenei's death, protests erupted in India, especially among Shia Muslims. Restrictions were imposed in Srinagar, with schools closed. Iran vowed revenge for the joint US-Israel attack, escalating tensions in the Middle East.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेईIndiaभारत