क्राईम- भाजलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू
By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:04:18+5:302014-05-11T00:04:18+5:30
फोंडा : सिमेपायण-म्हार्दोळ येथे स्टोव्हचा भडका उडून भाजलेल्या उर्मिलादेवी प्रदीप चोबे (२६, मूळ उत्तरप्रदेश) या विवाहितेचा गोमेकॉत उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला.

क्राईम- भाजलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू
फ ंडा : सिमेपायण-म्हार्दोळ येथे स्टोव्हचा भडका उडून भाजलेल्या उर्मिलादेवी प्रदीप चोबे (२६, मूळ उत्तरप्रदेश) या विवाहितेचा गोमेकॉत उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला.पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ५ रोजी सकाळी स्टोव्ह पेटवीत असताना अचानक भडका उडाल्याने उर्मिलादेवी यांच्या साडीने पेट घेतला. आगीत भाजल्याने त्यांना त्वरित गोमेकॉत दाखल करण्यात आले. गोमेकॉत उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आला. उर्मिलादेवी १२ वर्षांपूर्वी म्हार्दोळ येथे भाड्याच्या खोलीत राहात असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.