बोलेरोच्या धडकेत दिंडोरीच्या इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:08+5:302014-12-20T22:27:08+5:30
नाशिक : चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत जखमी झालेले दिंडोरी तालुक्यातील गणपत सखाराम वाघमारे यांचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला़ याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गणपत सखाराम वाघमारे (५०, मोखवल, पो़ गांडोळे, ता़ दिंडोरी) यांना ओढ्याजवळ बोलेरो वाहन (एमएच १५, ईबी १३७१) ने धडक दिली़ त्यामध्ये त्यांच्या तोंडास, पायास जबर मार लागल्याने १०८ मोबाइल व्हॅनमधून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायधनी यांनी घोषित केले़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बोलरोचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

बोलेरोच्या धडकेत दिंडोरीच्या इसमाचा मृत्यू
न शिक : चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत जखमी झालेले दिंडोरी तालुक्यातील गणपत सखाराम वाघमारे यांचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला़ याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गणपत सखाराम वाघमारे (५०, मोखवल, पो़ गांडोळे, ता़ दिंडोरी) यांना ओढ्याजवळ बोलेरो वाहन (एमएच १५, ईबी १३७१) ने धडक दिली़ त्यामध्ये त्यांच्या तोंडास, पायास जबर मार लागल्याने १०८ मोबाइल व्हॅनमधून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायधनी यांनी घोषित केले़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बोलरोचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)