शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

बोअरवेलमधून काढलेल्या बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 08:30 IST

दीडशे फूट खोल बोअरवेलमधून (कूपनलिका) बाहेर काढण्यात आलेल्या दोन वर्षांच्या फतेहवीर सिंग या बालकाला वाचविण्यात मात्र यश आले नाही.

संगरूर (पंजाब) : सलग एकशे दहा तास प्रयत्नांची शर्थ करून दीडशे फूट खोल बोअरवेलमधून (कूपनलिका) बाहेर काढण्यात आलेल्या दोन वर्षांच्या फतेहवीर सिंग या बालकाला वाचविण्यात मात्र यश आले नाही. फतेहवीर पुन्हा आपल्या समक्ष खेळेल, बागडेल या आशेने पाच दिवस अहोरात्र वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांना अखेर त्याला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप द्यावा लागला.भगवानपुरा गावातील त्याच्या घराजवळच असलेल्या बोअरवेलमध्ये तो गुरुवारी सायंकाळी चार वाजता खेळता खेळता पडला. बोअरवेल कापडाने झाकलेले असल्याने तो सात इंच रुंद आणि १५० फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये पडला. त्याच्या आईने त्याला वाचविण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले; परंतु तिला यश आले नाही. सोमवारीच फतेहवीर सिंग दोन वर्षांचा झाला होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता.फतेहवीरला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, नागरी प्रशासनाने व्यापक बचाव मोहीम राबविली. त्याच्यापर्यंत प्राणवायूचा पुरवठा करण्यात बचाव पथकाला यश आले होते; परंतु अन्न-पाणी पोहोचू शकले नाही. त्याला वाचविण्यासाठी बोअरवेलच्या समांतर दुसरा बोअरवेल खोदण्यात आला होता. सलग पाच दिवस बचावकार्य सुरू होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून त्याच्या कुटुंबियांना धीर दिला. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, सुखबीर सिंह बादल, आदींनी फतेहवीरच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले.हॉस्पिटलबाहेर जमलेल्या संतप्त गावकºयांनी बचाव कार्य उशिरा सुरू करण्यात आल्याचा प्रशासनावर आरोप केला. >अथक केलेले बचाव कार्य अपयशीमंगळवारी सकाळी साडेपाच वाजता राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या बचाव पथकाने या बालकाला बाहेर काढल्यानंतर त्याला डॉक्टर आणि जीवनरक्षक कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रसज्ज रुग्णवाहिकेतून तातडीने १३० किलोमीटर दूर असलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेत (पीजीआयएमईआर) नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानुसार काही दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पीजीआयएमईआर येथून त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरने गावी आणण्यात आल्यानंतर गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.