विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
व जेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यूमुलचेरा (जि़ गडचिरोली) : वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाह असलेल्या तारांच्या स्पर्शाने शौचास गेलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चपराळा अभयारण्याच्या क्षेत्रात मच्छीगा गावाजवळ रविवारी रात्री घडली. सुरेश रघुनाथ कुसनाके (२२) अरूण मल्ला पानेमवार (१९) अशी मृत युवकांची नावे आहेत. मच्छीगा जंगल परिसरात नेहमीच वीज प्रवाह असलेल्या तारांच्या सहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)